आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री महिलांवर एकांतात 'उपचार' करायचे आसाराम, सेवक शिवाकडे आहे सीडी!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- आसाराम बापूंचा सेवक शिवा याच्‍या चौकशीमध्‍ये अनेक खळबळजनक गोष्‍टी समोर आल्‍या आहेत. आसाराम बापू महिलांना रात्री एका खास खोलीत भेटायचे. या खोलीचे नाव 'ध्‍यान की कुटीया' असे ठेवण्‍यात आले होते. या खोलीत आसाराम एकांतात महिलांवर 'उपचार' करायचे, अशी माहिती शिवाने दिल्‍याचा दावा पोलिसांनी केला आहे. शिवाने या खोलीतील प्रकारांचे शुटींग केले असून त्‍याची सीडीही बनविल्‍याचा दावा केला आहे. ही सीडी जप्‍त करण्‍यासाठी अहमदाबादला जावे लागेल, असे सांगून पोलिसांनी शिवाची चौकशी करण्‍यासाठी आणखी 5 दिवसांची कोठडी मागितली होती. न्‍यायालयाने ही विनंती मंजूर केली.

पीडित मुलीला रेल्‍वे स्‍थानकावरुन आश्रमापर्यंत आणण्‍याची जबाबदारी शिवावर सोपविण्‍यात आली होती. त्‍याने पीडित मुलीला तिच्‍या कुटुबियांसह ऑटोरिक्षातून आश्रमात येण्‍यास सांगितले होते. फोनवरुन तो त्‍यांच्‍या संपर्कात होता. शिवा आणि छिंदवाड्यातील होस्‍टेलची वॉर्डन शिल्‍पी यांनी मुलीला आसाराम बापूंपर्यंत पोहोचविले होते. शिल्‍पी सध्‍या फरार आहे. तिच्‍या अटकेनंतर आणखी खुलासे होतील. त्‍यामुळे आसाराम बापूंच्‍या अडचणी आणखी वाढतील, हे स्‍पष्‍ट आहे.