आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम प्रकरण : हल्ल्यानंतर साक्षीदारांचे कुटुंबीय दहशतीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फरनगर - लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आसाराम बापूंविरोधात सुरू असलेल्या खटल्यातील एका साक्षीदारावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर अन्य एका साक्षीदाराचे कुटुंबीय दहशतीत आहेत. राहुल सचान नामक साक्षीदारावर जोधपूरच्या न्यायालयातून बाहेर आल्यानंतर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे अखिल गुप्ता या अन्य साक्षीदाराचे कुटुंबीय सध्या दहशतीखाली असून त्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे, असे आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी सांगितले आहे.
आसाराम बापूंचे स्वयंपाकी आणि सहायक असलेले अखिल गुप्ता यांची ११ जानेवारीला मुजफ्फरनगरमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यांचे मारेकरी अद्यापही फरार आहेत. राहुल सचान हेसुद्धा आसाराम बापूंच्या सेवादारांपैकी एक आहेत. शुक्रवारी ते जोधपूरच्या कोर्टात हजर राहिले होते.