आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Entreat In Front Of Physician Jodhpur Rajasthan

वेदना सहन होत नाही, यातून मुक्ती द्या! डॉक्टरांसमोर आसाराम यांची हात जोडून विनंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अल्पवयीन विद्यार्थीनेच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात असलेले आसाराम यांना शुक्रवारी आयुर्वेद विद्यापीठाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. होळी तुरुंगात साजरी करावी लागल्यानंतर रंग उडालेले आसाराम येथे जरा निवांत दिसत होते. आज (शनिवार) सकाळी रिकाम्या पोटी त्यांची तपासणी होणार होती मात्र, त्यांनी त्याआधीच नाश्ता केला. यामुळे हॉस्पिटलमधील एक दिवसाचा मुक्काम वाढला आहे.
आसाराम म्हणाले, या त्रासातून मुक्ती द्या
हॉस्पटलमध्ये आसाराम डॉक्टरांना वारंवार हात जोडून म्हणत होते, वैद्यजी, माझ्या डोक्यात अतिशय वेदना होत आहेत. मला यातून मुक्ती द्या.
स्वतःच्याच आश्रमातील अल्पवयीन विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात आसाराम यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर गेल्या वर्षी त्यांना प्रथम 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना तुरुंगातील दवाखाण्या शेजारील कोठडीत ठेवण्यात आले आहे. या कोठडीत याआधी भंवरी देवी प्रकरणातील आरोपी माजी मंत्री महिपाल मदेरणाला ठेवण्यात आले होते.
आसाराम यांना जेव्हा कोर्टात हजर करायचे असते, तेव्ह मोठ्या बंदोबस्तात तुरुंगातून बाहेर नेले जाते. आयुर्वेद विद्यापीठाच्या हॉस्पीटलमध्येही त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. आज सकाळी 4 वाजता ते उठले, दंड-बैठक आणि योगा केला. येथे त्यांना तिस-या मजल्यावरील तीन बेड असलेल्या विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी छायाचित्र