आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच्या पायावर उभेही राहू शकत नाही आसाराम, असे पोहोचले हॉस्पिटलमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधीकाळी सिंहासनावर विराजमान होणारे आसाराम आता व्हिल चेअरवर हॉस्पिटलमध्ये. - Divya Marathi
कधीकाळी सिंहासनावर विराजमान होणारे आसाराम आता व्हिल चेअरवर हॉस्पिटलमध्ये.
जोधपूर (राजस्थान) - कधीकाळी भक्तांच्या गराड्यात गळ्यात फुलांच्या माळा घालून नाचणारे स्वंयघोषित संत आसाराम बापू आता स्वतःच्या पायाने चालू देखील शकत नाहीत. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात असलेल्या आसाराम यांना कमरेपासून खाली त्रास होत असल्याची माहिती आहे. दोन दिवसांपूर्वी तुरुंग पोलिसांनी आसाराम यांना येथील महात्मा गांधी हॉस्पिटलमध्ये (एमजीएच) उपचारांसाठी आणले होते, त्यानंतर हा खुलासा झाला आहे.
वेळ सकाळी 11.30 ची, स्थळ एमजी हॉस्पिटल, जोधपूर
पोलिसांची एक व्हॅन एमजीएचच्या पोर्चमध्ये येऊन उभी राहाते. पोर्चमध्ये आधीच उपस्थित असलेले पोलिस व्हॅनला वेढा टाकतात. व्हॅनमधून दणदण बुट आदळत काही पोलिस बाहेर येतात. त्यानंतर एक व्हिल चेअर उतरवली जाते. त्या व्हिल चेअरमध्ये बसलेले असतात लैंगिक शोषणाच्या आरोपात अटकेत असलेले आसाराम. मात्र त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेच तेज नसते. तो निस्तेज चेहरा सर्वांकडे आशाळभूत नजरेने पाहात असतो.

पोलिस वेगात व्हिल चेअर घेऊन हॉस्पिटलमध्ये प्रवेश करतात. दार बंद केले जाते. डॉ. गिरधरसिंह भाटी पोलिसांना सामोरे जातात. पोलिस त्यांना सांगतात, आसाराम यांना कमरेखाली त्रास होत आहे. त्यांच्या गुडघे आणि पायात वेदना होत आहेत. न्यूरोसंबंधीही (मेंदूविकार) त्यांचा त्रास वाढला आहे. ते स्वतः चालू शकत नाहीत.

यावर डॉ. भाटी यांनी त्यांना ऑर्थोपिडीक विभागात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यावर पोलिसांनी प्रश्नार्थक चेहरे करुन हा विभाग कुठे आहे, असा प्रतिप्रश्न केला.
अखेर गर्दीला चिरत पोलिस व्हिल चेअर ढकलत ऑर्थोपिडीक विभागात पोहोचतात. अचानक पोलिसांचा एवढा मोठा लवाजमा पाहुन रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अचंबीत होतात. येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने पोलिसांची तारांबळ उडते.

तोपर्यंत हॉस्पिटल प्रशासनाला माहिती मिळते की आसाराम यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. डॉ. हेमंत जैन यांना आसाराम यांना पाहाण्यासाठी पाठवले जाते. जवळपास अर्धातास चेकअप सुरु राहाते. यादरम्यान हॉस्पिटलमधील इतर पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांना ताटकळत उभे राहावे लागते. कारण ओपीडीचे दार पोलिसांनी बंद केलेल असते. ऑर्थोपिडीक विभागातही पोलिसांचा फौजफाटा रस्ता अडवून उभा असतो.

याच दरम्यान आसाराम यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची माहिती त्यांच्या भक्तांना कळते आणि ते हॉस्पिटलच्या गेटबाहेर गर्दी करतात. जेव्हा पोलिस आसाराम यांना पुन्हा तुरुंगात घेऊन जाण्यासाठी मेनगेटकडे निघतात तेव्हा त्यांचे भक्त पोलिसांमागे धावतात. त्यामुळे आसाराम यांना मागच्या दाराने बाहेर काढावे लागते.

पोलिसांनी आधी काहीही कळवले नसल्याने धावपळ
- महात्मा गांधी हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. पी.सी.व्यास म्हणाले, तुरुंग पोलिसांनी आसाराम यांना हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आणले जाणार आहे हे आधी कळविले असते तर अशी धावपळ झाली नसती.
- आसाराम यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले हे मीडियामुळे आम्हाला समजले. ऑर्थोपिडीक विभागाचे प्रमुख डॉ. हेमंत जैन यांनी त्यांना तपासले असून त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोणत्या अवस्थेत पोहोचले हॉस्पिटलमध्ये...
बातम्या आणखी आहेत...