जोधपूर - अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणप्रकरणी अटकेत असलेल्या
आसाराम बापूंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना जमिनीवर झोपण्याचा तसेच फक्त दूध आणि शिरा किंवा लापशी खाण्याचा सल्ला दिला आहे.
जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेले आसाराम बापू यांनी झोप लागत नसून अंगदुखी तसेच चालताना त्रास होत असल्याची तक्रार अधिकार्याकडे केली होती. मेडिकल बोर्डने त्यांची तपासणी करून त्यांना येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आयुर्वेद विद्यापीठाच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान आसाराम बापूंच्या रक्ताची आणि लघवीची चाचणी करण्यात आली. परंतु रिपोर्टमध्ये काहीच आढळून आले नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाराम बापूंना स्लीप डिस्कचा त्रास होता, मेडिकल बोर्डाच्या सल्ल्यानुसार बापूंवर तेलधारा उपचार करण्यात आले. यासाठी त्यांना विर्शांतीची गरज होती आणि ते तुरुंगातही शक्य होते म्हणून त्यांना परत तुरुंगात रवाना केले.