आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम म्‍हणाला मी तर गाढवांच्या श्रेणीत; बनावट बाबांच्या यादीत नाव टाकल्यामुळे संतप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- बनावट बाबांच्या यादीत आपले नाव टाकल्याबद्दल अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी आसाराम संतप्त झाले आणि मी तर गाढवांच्या श्रेणीतील आहे, असा उल्लेख त्यांनी केला.
 
गुरुवारी आसाराम यांना तुरुंगातून न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आले होते. तेथे माध्यमांच्या प्रतिनिधींनी आसाराम यांना, तुम्ही संत आहात की कथावाचकाच्या श्रेणीत? असा प्रश्न विचारला. त्यावर आसाराम म्हणाले, ‘मी तर गाढवांच्या श्रेणीत आहे,’ असे म्हणून ते न्यायालयात गेले. हा प्रश्न दोन दिवसांपासून ते जेव्हा न्यायालयात येत असत तेव्हा विचारला जात होता. पण ते निघून जात असत. आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी १० सप्टेंबरला १४ बाबांची यादी जारी करून त्यांना बनावट घोषित केले होते. तीत पहिले नाव आसाराम यांचे होते.
बातम्या आणखी आहेत...