आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम बापू डॉक्टरांना म्हणाले, \'अभी तो मैं जवान हूं\', माझ्यावर सर्जरी कराच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- जोधपूर मध्यवती तुरुंगात कैद असलेले आध्यत्मिक संत आसाराम यांना 'ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया' हा आजार असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मथुरादास माथुर रूग्णालयात त्यांना गुरुवारी (7 ऑगस्ट) तपासणीसाठी नेण्यात आले होते. आसाराम यांना डॉक्टरांनी तपासले. परंतु, या वयात त्यांच्यावर सर्जरी करता येणार नसल्याचे सांगितले. त्यावर आसाराम म्हणाले, 'अभी तो मैं जवान हूं', डॉक्टर माझ्यावर सर्जरी कराच!'

मथुरादास माथुर रूग्णालयात डॉ. गर्ग यांनी आसाराम यांच्या काही तपासण्या केल्या. आसाराम यांना 'ट्रायजेमिनल न्यूरेल्जिया' हा आजार असल्याचे सांगितले. मात्र, आसाराम यांचे वय खूप आहे. त्यामुळे या वयात सर्जरी करता येणार नाही. त्यावर आसाराम म्हणाले, मी अजून तरुण आहे, डॉक्टर माझ्यावर सर्जरी करू शकतात. त्यावर डॉ. गर्ग यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

डॉ. गर्ग यांनी आसाराम यांच्या औषधीची मात्रा वाढवून दिली आहे. एकावेळी आसाराम यांना तीन-तीन टॅबलेट्‍स घ्यायचा सल्ला डॉ. गर्ग यांनी दिला आहे. परंतु औषधी नियमित न घेतल्यास त्यांच्यावर दोन सर्जरी कराव्या लागतील, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे. दोन पैकी एक सर्जरी जोधपूर येथे होऊ शकते. परंतु दुसर्‍या सर्जरीसाठी त्यांना राज्यबाहेर हलववावे लागेल. दरम्यान, मागील वर्षी अटक झाल्यानंतर आसाराम यांनी सर्जरीसाठी नकार दिला होता.

आसाराम नियमित औषधी घेत नसल्याने त्याच्या साइड इफेक्टचा धोका वाढला आहे. आसाराम दररोज सकाळी- संध्याकाळी अर्धी-अर्धी टॅबलेट घेत होत. त्यांना डॉक्टरांनी दररोज दोन दोन टॅबलेट्‍स घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. आता मात्र, आसाराम यांनी नियमित तीन तीन टॅबलेट्‍स न घेतल्यास त्यांच्यावर सर्जरी करण्याची वेळ येऊ शकते, असेही डॉ. गर्ग यांनी सांगितले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आसाराम यांना प्रचंड वेदना होत असल्याने मंगळवारी आणले होते रुग्णालयात...