आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Sings Song After Court Hearing In Jodhpur

आसाराम यांचा कोर्टात बदलला मूड, गायले \'जोगी हम तो लुट गए तेरे प्यार में..’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर (राजस्थान) - अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या आरोपात दोन वर्षांपासून जोधपूर तुरुंगात कैद असलेले आसाराम यांचा मंगळवारचा अंदाज काही निराळाच होता. नेहमी उदास दिसरणारे आणि चिडचिड्या स्वभावाचे आसाराम कोर्टरूममधून नाचत-गात बाहेर आले. आसाराम ‘जोगी हम तो लुट गए तेरे प्यार में..’हे गाणे गुणगुणत होते. मात्र त्यांनी मीडियाच्या एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. फक्त हात जोडले आणि ते पुढे निघाले.

समर्थकांची जमली गर्दी
आसाराम यांना कोर्टात हजर करणार हे कळाल्यानंतर त्यांचे अनेक समर्थक जोधपूर कोर्टाबाहेर जमले होते. समर्थक कोर्ट परिसरात घुसणार नाही यासाठी मोठा बंदोबस्त होता. त्यामुळे समर्थक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. आसाराम यांना तुरुंगातून घेऊन येणारी पोलिस व्हॅन दिसता क्षणी त्यांची एक झलक पाहाण्यासाठी झुंबड उडाली होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोर्टरुम बाहेर निघताना आसाराम...