आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायाधीशांवर जोडा भिरकावण्याच्या तयारीतील आसाराम समर्थकाला अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर (राजस्थान) - अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात जोधपूर तुरुंगात असलेल्या आसाराम यांची बुधवारी सुनावणी होती. त्याआधी कोर्टात त्यांचा एक समर्थक न्यायाधीशांवर जोडा भिरकावण्याच्या तयारीत होता. त्याला वेळीच अटक करण्यात आली आहे. त्यानंतरही त्याचा राग शांत झाला नाही. तो म्हणाला, मी साक्षात शिवशंकर आहे. न्यायाधीशांना धडा शिकवल्या शिवाय मी राहाणार नाही.
लैंगिक शोषणातील आरोपी आसाराम यांची सेशन कोर्टात दैनंदिन सुनावणी सुरु आहे. त्यामुळे आसाराम यांना रोज कोर्टात हजर केले जात आहे. यावेळी त्यांचे अनेक समर्थक कोर्टात हजर राहातात. बुधवारी या प्रकरणाची सुनावणी सुरु होण्याआधी आसाराम यांचा एक समर्थक न्यायाधीश ज्या मार्गाने कोर्टात येतात तिथे हाता बुट घेऊन उभा होता. तो त्याच्या साथीदारांना सांगत होता, की जज न्याय करत नाही, त्यामुळे मी त्यांच्यावर जोडा भिरकावून विरोध दर्शवणार आहे. त्याची ही बातचीत तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी ऐकली आणि पोलिसांना माहिती दिली. पोलिस आल्यानंतरही आसाराम समर्थक हातात बुट घेऊन उभा होता.
अलाहाबादचा रहिवासी
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथील रहिवासी असल्याचे कळाले आहे. त्याचे नाव अक्षय शिवम शुक्ला असल्याचे त्याने सांगितले. त्याचे म्हणणे आहे, की न्यायाधीश न्याय करत नाही, त्यामुळेच त्यांना धडा शिकवायचा आहे. त्याने आसाराम यांच्याकडून 2001 मध्ये दीक्षा घेतली आहे.
सुरक्षेत वाढ
अक्षय शुक्लाला अटक केल्यानंतर कोर्ट परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली. त्यासोबतच आसाराम यांची सुनावणी ज्या कक्षात होत होती, तिथे संपूर्ण चौकशी करुनच संबंधीतांना सोडण्यात आले. कोर्ट परिसरातील आसाराम समर्थकांना हुसकावून लावण्यात आले.