आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: महिला कॉन्स्टेबलवर आसाराम भक्ताने टाकला हात, पोलिसांनी दिला बेदम चोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर (राजस्थान) - अल्पवयीन विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात असलेल्या आसाराम यांची कोर्टात हजेरी आणि समर्थकांचा धुडगूस बुधवारी पुन्हा पाहायला मिळाला. आसाराम यांना कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी कोर्ट परिसरात घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले मात्र उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील प्रशांत अग्निहोत्री या युवकाने महिला पोलिस कॉन्स्टेबलसोबत हुज्जत घालत पोलिस कर्मचार्‍यावर हात टाकला. तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी हे दृष्य पाहाताच, धावत जाऊन महिला कॉन्स्टेबलला त्याच्या तावडीतून सोडवले आणि आरोपी युवकाला बेदम चोप दिला.
पोलिसांनी प्रशांत अग्निहोत्रीला अटक केली आहे. त्याला सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील नागपूर येथून आलेली कल्पना बुनकर हिला सरकारी कामात अडथळा आणि शांतता भंग केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.
...आणि सहकारी पोलिस तुटून पडले
मारहाण करणार्‍या युवकाला महिला कॉन्स्टेबलच्या सहकार्‍यांनी रस्त्यावरच पोलिसी खाक्या दाखविला. युवकाला खाली पडेपर्यंत पोलिसांनी चोप दिला. प्रशांतला मारझोड सुरु झाल्यानंतर आसाराम समर्थक पसार झाले. त्यानंतर कोर्ट परिसरात एकही समर्थक दिसला नाही.
पुढील स्लाइडमध्ये पाहा VIDEO आणि कसा दिला आसाराम समर्थकाला चोप