आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Supporters Giving Bribe To Console Principal Rajasthan

पीडितेच्या वयात फेरफारासाठी आसाराम समर्थकांची मुख्याध्यापकांना धमकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अल्पवयीन विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात तुरुंगात असलेले स्वयंघोषित संत आसाराम यांच्या समर्थकांनी शाहजहांपूर येथील सरस्वती बाल मंदिर शाळेच्या मुख्याध्यापकांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आसाराम यांच्या समर्थकांनी मुख्याध्यापकांना पीडित मुलीच्या वयाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करुन ती अल्पवयीन नसल्याचा पुरावा तयार करण्यास सांगितले होते. त्याबदल्यात मुख्याध्यापकांना 50 लाख रुपयांची ऑफर दिली होती. मुख्याध्यापकांनी ही ऑफर नाकारल्यानंतर त्यांना धमकीची पत्रे पाठविण्यात आली. एवढेच नाही तर, त्यांच्या घरी बंदूकीचे काडतूस पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली. याविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार केली आहे.
दुसरीकडे, जोधपूर पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत विद्यार्थीनीने शाळेत दुस-या वर्गात प्रवेश घेतला त्यामुळे तेव्हा दिलेल्या जन्मतारखीनुसार आता ती सज्ञान झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. जोधपूर पोलिसांकडे ही तक्रार आल्यानंतर गेल्या एक महिन्यापासून पोलिस शाहजहांपूरच्या प्राथमिक शाळेकडे पीडितेच्या वयासंबंधीच्या कागदपत्रांची मागणी करीत आहेत, मात्र ते अद्याप मिळालेले नाहीत.

पुढील स्लाइडमध्ये, आसाराम समर्थकांचे प्रकरण कमकुवत करण्याचे प्रयत्न