आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाच्या मोबाइलमध्ये सापडला आसारामबापूंचा मुलींसोबत व्हिडिओ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - आसारामबापूंची एक सीडी असल्याच्या बातम्या गुरुवारी दिवसभर माध्यमांनी चालवल्या. या सीडीसाठी पोलिस अहमदाबादला जाणार आहेत. मात्र, हे सत्य नाही. ‘दै. भास्कर’ने वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना सीडीविषयी विचारले. तेव्हा सीडी नव्हे, शिवा नामक अनुयायाच्या मोबाइलवर एक व्हिडिओ क्लिपिंग सापडल्याचे पोलिस म्हणाले. यात बापू एका मुलीचे खांदे आणि मानेवर हात फिरवत असल्याचे दिसत आहे.

जोधपूर आश्रमातील या रॅकेटमध्ये एक टोळकेच कार्यरत होते. शिवाने आश्रमातील अनेक गुपिते उघड केली आहेत. निष्पाप मुलींना फसवून बापूंपर्यंत नेले जायचे. ज्या पीडित मुलीने बापूंवर आरोप केले आहेत तिलाही असेच फसवले गेले. यात शिल्पी व शरतचंद्र यांची महत्त्वाची भूमिका होती.

त्रिनाडी शूल झाल्याचे पत्र, वैद्य महिलेस तुरुंगात बोलावण्याची मागणी