आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचाराकरिता आसाराम दिल्लीत, पोलिस आणि समर्थक भिडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी आसाराम याला उपचारासाठी जोधपूर पोलिसांनी बुधवारी( ता.31) दिल्लीला नेण्‍यात आले होते. दिल्लीतील एम्समध्‍ये वैद्यकीय तपासणी करण्‍यात येईल. मंडोर एक्स्प्रेसने शुक्रवारी(ता.31) आसारामला पुन्हा जोधपूरला आणण्‍यात येणार आहे.सुरक्षेची चोख व्यवस्था करण्‍यात आली आहे. यात एक पोलिस अधीक्षक, एक निरीक्षकासह 17 पोलिस शिपाई आसारामबरोबर गेले आहेत. तसेच त्याचे समर्थकही मंडोर एक्स्प्रेसमध्‍ये बसलेले आहे.
जेवणानंतर कोचमध्‍ये केले वॉक
आसारामने रेल्वेत जेवणानंतर 45 मिन‍िटे वॉक केला. दैनिक भास्करचे छायाचित्रकार विकास बोडाही रेल्वेने दिल्लीपर्यंत गेले.
समर्थक प्रवाशी आणि पोलिस यांच्यात बाचाबाची
आसारामला दिल्लीहून जोधपूरकडे नेताना रेल्वे स्टेशनवर समर्थक पोलिसांमध्‍ये धक्काबुक्की झाली.

पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे...