आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला वैद्याला बोलावण्याचे पत्र आसाराम यांचेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - किशोरवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरून तुरुंगवासात असलेले आसाराम यांनीच महिला वैद्याला बोलावले होते. त्यासाठी पत्र लिहिले होते. ही बाब सत्य असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. त्यांच्या वकिलाने अगोदर हे पत्र खोटे असल्याचा दावा केला होता.


आपल्याला त्रिनाडी शूल नावाचा आजार असल्याने महिला वैद्य नीता यांना पाठवण्यात यावे, असे आसाराम यांनी चार सप्टेंबर रोजी न्यायालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. नीता यांना तुरुंगात पाठवण्याची परवानगी त्यांनी या पत्रातून मागितली होती. परंतु सहा सप्टेंबरच्या सुनावणीत आसाराम यांच्या वकिलाने पत्रावर संशय व्यक्त केला होता. या पत्राबद्दल आपण आसाराम यांची भेट घेऊनच पत्राच्या सत्यतेबाबत विचारणा करू, असे वकिलाने म्हटले होते.


वैद्यकीय अहवाल मिळाला नाही : तुरुंगात आसाराम बापूंना औषधी खाद्य पदार्थासह विशेष सुविधा देण्याच्या पाश्र्वभूमीवर मंगळवारी सुनावणी झाली नाही. न्यायालयाला आसाराम यांचा वैद्यकीय अहवाल अद्याप मिळालेलाच नाही. त्यामुळे पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे.