आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपुर - अल्पवयीन विद्यार्थीनीच्या अत्याचारप्रकरणी अटकेत असलेल्या आसाराम बापू यांचा खासगी आचारी प्रकाश अणि छिंदवाडा येथील गुरूकुलचा संचालक शरद यांनी शुक्रवारी न्यायालयात शरणागती पत्करली. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे आसाराम यांच्याविरोधातील आरोपपत्र लवकर दाखल होऊ शकेल व त्यांच्या जामीनासाठी प्रयत्न करता येतील असा बापूंचे वकील राम जेठमलानी यांचा होरा आहे.
प्रकाश व शरद या दोघांनीही गुरुवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.नंतर अर्ज परत घेतला आणि शुक्रवारी याच न्यायालयात दोघेही शरण आले. या दोघांच्या वैद्यकीय तपासणीनंतर 24 तासांच्या आत पोलिस दोघांनाही न्यायालयासमोर हजर करणार आहे. दरम्यान, छिंदवाडा गुरुकूलच्या महिला वसतीगृहाची वॉर्डन शिल्पी उर्फ संचिता गुप्ता यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी 25 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.