आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे आसाराम यांचा PA, याच्या एका जबाबाने संपूर्ण कुटुंब जाईल तुरुंगात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाराम यांचा पीए महेंद्र चावला. इन्सेट - आसाराम - Divya Marathi
आसाराम यांचा पीए महेंद्र चावला. इन्सेट - आसाराम
पानीपत - बलात्काराच्या आरोपात कित्येक महिन्यांपासून तुरुंगात कैद असलेले आसाराम आणि नारायण साई यांच्याविरोधातील प्रमुख साक्षीदार महेंद्र चावलावरील प्राणघातक हल्ल्यात पोलिसांना गुरुवारी नारायण साईला प्रोडक्शन वॉरंटवर पानीपत कोर्टात हजर करायचे आहे. आसाराम यांच्या सर्व प्रकरणात महेंद्र साक्षीदार आहे. त्याने तोंड उघडले तर आसाराम यांचे संपूर्ण कुटुंब तुरुंगात जाऊ शकते.

महेंद्रवर पानीपतमध्ये 13 मे रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. दोन बाइक स्वारांनी त्याच्यावर गोळीबार केला होता. त्यानंतर त्याच्या संरक्षणासाठी एक गनमॅन देण्यात आला होता. आसाराम प्रकरणातील दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची याआधीच हत्या करण्यात आली आहे. त्यासोबतच जोधपूर कोर्टाबाहेर जमावाने एका साक्षीदारावर जीवघेणा हल्ला केला होता. महेंद्रने त्याच्यावर झालेल्या हल्ल्याला आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई जबाबदार असल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात हायकोर्टाचे वकील निशांत घनघस देखील सहभागी असल्याचा महेंद्र चावलाने आरोप केला होता.

आतापर्यंत या साक्षीदारांवर झाले हल्ले
14 फेब्रुवारी 2015 रोजी जोधपूरमध्ये सुनावणीनंतर कोर्टाबाहेर पोलिसांसमक्ष महत्त्वाचा साक्षीदार राहुल सचानवर आसाराम समर्थकांनी चाकू हल्ला केला होता. 12 जानेवारी 2015 रोजी आसाराम यांचा माजी स्विय सहायक अखिल गुप्ताची उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

कोण आहे महेंद्र चावला
महेंद्र चावला 1998 ते 2005 पर्यंत नारायण साईचा पीए होता. त्याने स्वतः जोधपूर पोलिसांशी संपर्क करुन आसाराम आणि नारायण या बाप लेकांचे कृष्णकृत्य सांगितले होते. त्याने सुरत आणि अहमदाबाद हायकोर्टातही जबाब नोंदवला होता.
पोलिस निरीक्षक नरेंद्र कुमार यांनी सांगितले, आतापर्यंत गुजरात पोलिसांनी संपर्क केलेला नाही. पुढील तारीख गुरुवारी कळणार आहे. याआधीही दोन तारखांना नारायण साईला हजर करण्यात आले नव्हते. नारायणला पानीपतला घेऊन येण्यासाठी रेल्वेचा पूर्ण डबा आरक्षित करता आला नाही असे कारण एकदा गुजरात पोलिसांनी दिले होते. त्यानंतर त्याला प्रोडक्शन वॉरंटवर हजर करण्यास त्यांनी नकार दिला होता. गुरुवारी त्याला हजर करण्याची तिसरी तारीख आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आसाराम यांच्या कुटुंबियाचे फोटोज्