म्हैसूर - कर्नाटकातील म्हैसूरमध्ये अशिता बाबू आणि शकील अहमद यांनी लग्न केले. लग्नासाठी अशिताने धर्मपरिवर्तन केले आणि ती शाइस्ता झाली होती. जेव्हा निकाह सुरु होता, तेव्हा बाहेर हिंदुत्ववादी संघटना त्याला जोरदार विरोध करत होत्या. मात्र कुटुंबियांनी त्यांचा विरोध झुगारून लग्नावर ठाम राहिले आणि म्हणाले, की आपण सर्व एक आहोत. अखेर पोलिस बंदोबस्तात लग्न लागले.
व्हिएचपीचा लव्ह जिहादचा आरोप
- रविवारी अशिता आणि शकील यांचे लग्न झाले. दोघेही 28 वर्षांचे आहेत.
- मांड्या येथे ते शेजारी राहात होते, मात्र नंतर शकीलचे कुटुंब दुसरीकडे शिफ्ट झाले.
- मांड्या येथे अशिताच्या घराबाहेर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या लग्नाला 'लव्ह जिहाद' ठरवत जोरदार घोषणाबाजी करुन लग्न सोहळा बंद पाडण्याचा प्रयत्न केला.
- आंदोलकांचा आरोप होता की हे लव्ह जिहाद प्रकरण आहे. त्यांचा आरोप होता, की शकील मुस्लीम आहे आणि त्याने अशितासोबत बळजबरीने लग्न केले.
- कर्नाटक व्हिएचपी सचिव बी. सुरेश म्हणाले, हे पुर्णपणे लव्ह जिहाद प्रकरण आहे. जर हा प्रेमविवाह असेल तर आमची कोणतीही तक्रार नाही, मात्र हे लग्न बळजबरीने केले जात आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा,
>> काय म्हणाली अशिताची आई...
>> अशिता आणि शकील यांचे आहे 12 वर्षांचे प्रेम
>> कोण आहे अशिता आणि कसे झाले लग्न