आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक हिंदू दांपत्याला 5 मुले हवीत : सिंघल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- लोकसंख्येला आवर घालण्यासाठी सरकारने ‘हम दो हमारे दो’चा नारा दिला असला तरी विहिंप नेते अशोक सिंघल यांनी अफलातून सल्ला देत हिंदूंनी पाच अपत्यांना जन्म द्यावा, असे आवाहन केले. शनिवारी पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘धर्मांतराचा सपाटा पाहता आपल्या देशात आपण अल्पसंख्याक ठरण्याचा दिवस दूर नाही. या परिस्थितीत हिंदूंनी पाच अपत्ये जन्माला घातली पाहिजेत.’
लोकसभा निवडणुकीत विहिंप मोदींच्या सोबत राहील, असेही त्यांनी जाहीर केले. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपला 300 जागा मिळाल्यास अयोध्येत राम मंदिरही उभारले जाईल, असा विश्वासही सिंघल यांनी या वेळी व्यक्त केला.