आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Singhal Said Pakistan Will Be Merged Into India

पाकिस्तानचे भारतात विलिनीकरण होणे निश्चित, विह‍िंप नेते अशोक सिंघल यांचे वक्तव्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : सोमवारी मिर्झापूरमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना अशोक सिंघल

वाराणसी/म‍िर्झापूर : विश्व हिदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंघल यांनी सोमवारी एक खळबळजनक वक्तव्य केले. पाकिस्तानचे भारतात विलिनीकरण होणे निश्चित असल्याचे सिंघल म्हणाले. सिंघल याठिकाणी देवरहा बाबांच्या आश्रमात एका कार्यक्रमासाठी आले होते.
यावेळी सिंघल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदुत्‍वासंबंधी वक्तव्याचा बचावही केला. भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती हिंदु असल्याचे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले होते.

पाकिस्तानचे विलिनीकरण होणार - स‍िंघल
पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असून या गोळीबारामध्ये भारतीय जवानांचा बळी जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना सिंघल म्हणाले की, मोदी पाकिस्तानला उत्तर देण्यास सक्षम आहेत. सिंघल यांच्या मते, पाकिस्तानचे भारतात विलिनीकरण होणारच आहे, आणि ते कोणीही रोखू शकत नाही.

'संतांविरुद्ध कारस्थान'
सिंघल म्हणाले की, 'साध्वी प्रज्ञा आणि आसाराम बापू यांना तुरुंगात डांबण्याचे प्रकार म्हणजे काँग्रेसचे कारस्थान आहे. पण आता काळ बदलला आहे. मोदींना थोडे निवांत होऊ द्या, आता गोहत्येवर पूर्णपणे बंदी येईल. वाल्मिकी मंदिर आणि विंध्याचलमध्ये महाकाय दुर्गामंदिरल तयार होईल. तसेच सर्वांना वंदे मातरमही गावे लागेल.