आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashutosh Maharaj Samadhi In Freezer Now Latest News

डॉक्टरांनी मृत घोषित केले; भक्तांचा दावा आशुतोष महाराज समाधिस्थ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - पंजाबमधील दिव्य ज्योती संस्थान, नूरमहलचे संस्थापक आशुतोष महाराजांचे जीवन सध्या श्रद्धा की विज्ञान या वादात अडकले आहे. हृदय व नाडी आठ दिवसांपासून बंद असल्याने डॉक्टरांनी महाराजांना वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केले असले तरी भक्तांना मात्र महाराज समाधी अवस्थेत लीन असल्याचे वाटते. आता हे प्रकरण हरियाणा हायकोर्टापर्यंत गेले आहे. या प्रकरणी राज्य सरकार बुधवारी स्थितिदर्शक अहवाल सादर करेल. संपत्ती व गादीसाठी महाराजांना ओलीस ठेवण्यात आल्याचा दावा महाराजांचा जुना ड्रायव्हर पूर्णसिंह याने हायकोर्टात केला आहे. यावर हायकोर्टाने नोटीस बजावून आश्रमाला 11 फेब्रुवारीपर्यंत म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. महाराजांनी बारा वर्षांपूर्वी अशीच समाधी घेतली होती, असा भक्तांचा दावा आहे. रामकृष्ण परमहंस अशा अवस्थेत कित्येक दिवस राहत असत, असा दाखलाही हे भक्त देतात.

कोण आहे आशुतोष महाराज, वाचा पुढील स्लाइडमध्ये..