आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधूबाबाला स्‍वप्‍नात मिळाला 1000 टन सोन्‍याचा खजिना शोधण्‍याचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्‍नाव (उत्तर प्रदेश)- पुरतत्व खात्‍याने उत्तर प्रदेशच्‍या उन्‍नाव जिल्‍ह्यात एका साधूला आलेल्‍या स्‍वप्‍नावरुन 1 हजार टन सोन्‍याच्‍या खजिन्‍याचा शोध सुरु केला आहे. हा खजिना 19व्‍या शतकातील आहे. शोभन सरकार असे या साधूचे नाव आहे. एवढा मोठा खजिना सापडल्‍यास देशाची अर्थव्‍यवस्‍थाच रुळावर येईल.

शोभन सरकार यांनी दावा केला आहे, की त्‍यांना स्‍वप्‍नात राजा रावबक्ष सिंह आले होते. त्‍यांनी उन्‍नाव जिल्‍ह्यात ढौंडिया खेडा गावातील किल्‍ल्‍यात जाऊन तेथील 1000 टन सोने ताब्‍यात घेण्‍याचे आदेश दिले. राज राव यांनी 1857 च्‍या उठावात इंग्रजांविरुद्ध कट्टर संघर्ष केला होता. त्‍यांनी दिलेल्‍या स्‍वप्‍नसंकेतानंतर सरकार यांनी तत्‍काळ स्‍थानिक अधिका-यांना हे सांगितले. परंतु, त्‍यांनी सरकार यांची खिल्‍ली उडविली. अखेर त्‍यांनी शिष्‍य स्‍वामी ओम याला ही माहिती दिल. ओम याने तत्‍काळ केंद्रीय कृषी आणि अन्न प्रक्रिया राज्य मंत्री डॉ. चरणदास महंत यांना संपर्क केला. महंत यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि शोभन सरकार यांची भेट घेतली. महंत यांच्‍या दौ-यानंतर भूगर्भशास्‍त्र सर्वेक्षण विभाग असे पुरातत्त्व खात्‍याचे अधिकारी उन्‍नावमध्‍ये खोदकामाला लागले.