आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांमध्ये मोदी-शिंजो 11वी भेट, चीनच्या OBORला आशिया-आफ्रिका कॉरिडॉरने प्रत्युत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद/नवी दिल्ली- जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे बुधवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही दिवस ते गुजरातमध्येच राहतील. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद आणि गांधीनगरला नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदींसोबत ते भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची कोनशिला ठेवतील. त्यानंतर दोन्ही नेते बाराव्या भारत-जपान वार्षिक बैठकीत सहभागी होतील. त्या वेळी संरक्षण, समुद्री सुरक्षेसमवेत अनेक मोठे करार होण्याची अपेक्षा आहे. देशाच्या इतिहासात प्रथमच राजधानीच्या बाहेर दोन देशांत द्विपक्षीय चर्चा होणार आहे. “पंतप्रधान शिंजो आबे यांच्या स्वागतास आपण उत्सुक आहोत,’ असे ट्विट मोदींनी केले आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान चौथ्यांदा वार्षिक बैठक होत आहे. गांधीनगरच्या साबरमती आश्रमापर्यंत ते ८ किलोमीटरच्या रोड शोमध्येही सहभागी होणार आहेत.   

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचण्यांमुळे उत्तर-पूर्व आशियात आण्विक हल्ल्याचे सावट असताना आबे भारत दौऱ्यावर आले हे विशेष. वास्तविक चीन, दक्षिण चीन सागरात पाय पसरण्यासाठी धोरण आखत आहे. विश्लेषकांच्या मते, ट्रम्प यांचा दृष्टिकोन टाळाटाळीचा आहे. त्यामुळे चीनसोबत संघर्ष झाल्यास अमेरिकेला विश्वासार्ह मानता येणार नाही. दुसरीकडे, डोकलाम वादात भारताने भूतानसारख्या छोट्या देशाची बाजू घेत चीनचा सडेतोड विरोध केला. भारताच्या या भूमिकेला जपानने सार्वजनिकरीत्या समर्थन दिले. त्यामुळे आशियात भारत व जपान हे चीनच्या विस्तारवादी धोरणाविरोधात उभे राहू शकतात, असा संदेश जगभरात गेला. चीनच्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पाला (अाेबीअाेअार) प्रत्युत्तर देण्यासाठी भारत व जपानने आशिया-आफ्रिकी बेल्टचे व्हिजन मांडले. या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात अनेक मोठे करार होऊ शकतात.

- समझोते : आैद्योगिक पार्क  बनवण्यासाठी जपानची मदत  
गुजरातच्या हंसपूरमध्ये ३ हजार कोटींचा सुझुकी कार निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. साणंद व मंडलमध्ये आैद्योगिक प्रकल्पाची निर्मितीवर सामंजस्य करणार होईल. जपान-भारत यांच्यातील संयुक्त निर्मितीविषयक संस्था स्थापन करण्यासाठी करार होणार आहे. लिथियम, आयर्न बॅटरी प्रकल्पदेखील सुरू होऊ शकतो.  

- सामरिक : सी प्लेनच्या सौद्यालाही मंजुरी शक्य
भारत-जपान दरम्यान सागरी सुरक्षेबद्दलचा सौदाही होऊ शकतो. नौदलासाठी यूएस सी-प्लेनचाही करार पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो. या विमानाला अंदमान व निकोबार बेटांवर तैनात केले जाऊ शकते. जपानने १९६७ मध्ये शस्त्र निर्यातीवर बंदी घातली हेती. २०१४ मध्ये ती उठवली. तेव्हा सर्वात अगोदर भारताने संरक्षण करार केले होते.  

- आर्थिक : देशात गुंतवणुकीत  ८०%वाढ 
जपानने मेक इन इंडियाअंतर्गत गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू व राजस्थानमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रकल्पाला सुरुवात केली. २०१६-१७ मध्ये भारतात जपानची गुंतवणूक ८० टक्क्यांनी वाढून ४.७ अब्ज डॉलरमध्ये पोहोचली. २०१५-१६ मध्ये ही गुंतवणूक २ अब्ज डॉलर होती. 

घेराबंदी: अाफ्रिकी काॅरिडाॅरद्वारे चीनचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न
भारताने चीनच्या ‘वन बेल्ट-वन राेड’ (अाेबीअाेअार) प्रकल्पापासून स्वत:ला दूर ठेवले अाहे. या प्रकल्पाच्या प्रत्युत्तरादाखल भारताने अाफ्रिकी विकास बँकेच्या बैठकीत अाशिया-अाफ्रिका ग्राेथ काॅरिडाॅरचा शुभारंभ केला हाेता. हा माेदी व अॅबे यांचा ड्रीम प्राेजेक्ट अाहे. या दाैऱ्यात अॅबे या प्रकल्पाशी निगडित अनेक करार करू शकतात. या माध्यमातून भारत व जपान हे दाेन्ही देश अाशिया व अाफ्रिकन देशांमध्ये क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करू इच्छित अाहेत. या प्रकल्पांतर्गत भारत व जपान साेबत राहून अाफ्रिका, इराण, श्रीलंका व दक्षिण-पूर्व अाशियात अनेक पायाभूत प्रकल्पांवर काम करत अाहेत. 

मेक इन इंडिया: संरक्षण सामग्री बनवणाऱ्या कंपन्या येतील भारतात
इंडाेनेशियात बुलेट ट्रेन चालवण्यात जपानला चीनकडून पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत अॅबे शिंकासेन बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान निर्यात करण्याची तयारी करत अाहेत. जपानसमाेर भारताचा चांगला पर्याय अाहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत भारतात बुलेट ट्रेन चालवण्याची माेठी घाेषणा हाेऊ शकते. दाेन्ही पंतप्रधान इतरही अनेक प्रकल्प सुरू करतील. जपानसाेबत सैन्य सहकार्य वाढवण्यासह भारतास शस्त्रास्त्रे व अन्य सामग्रीच्या स्थानिक निर्मितीवर भर देण्यासाठी संरक्षण तंत्रज्ञान प्राप्त करण्यात मदत मिळण्याची शक्यता अाहे. त्यातून संरक्षण सामग्री बनवणाऱ्या जपानी कंपन्यांशी भारतात  लढाऊ विमाने व पाणबुड्या बनवण्याच्या प्रकल्पांवर चर्चा सुरू अाहे.

अॅबेंची पत्नी  १० कार्यक्रमांत सहभाग, ब्लाइंड पीपल असोसिएशनला भेट  
जपानचे पंतप्रधान अॅबे यांच्या पत्नी एइको अहमदाबाद दौऱ्यादरम्यान १० हून अधिक कार्यक्रमांत सहभागी होतील. त्या ब्लाइंड पीपल असोसिएशनला (बीपीए) देखील भेट देतील. जपान विद्यापीठाच्या मसाज थेरपीचा अभ्यासक्रम बीपीएमध्ये चालवला जातो.  

गाइड  १६व्या शतकातील सिदी सय्यद मशिदीतही जातील माेदी आणि अॅबे
माेदी व अॅबे हे अहमदाबादमधील प्रसिद्ध सिदी सय्यद मशिदीतही जातील. या १६व्या शतकातील मशिदीत माेदी हे शिंजाे यांच्या गाइडची भूमिका निभावतील. संध्याकाळी सात वाजता सूर्यास्तावेळी फाेटाे शूट हाेणार अाहे.

संजीव सिन्हा  हलाखीच्या परिस्थितीतून अायअायटीत गेले; बुलेट ट्रेन सल्लागार
जपानने संजीव सिन्हा यांची बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या सल्लागारपदी नियुक्ती केली अाहे. मूळचे राजस्थानमधील सिन्हा यांची १९८९मध्ये पहिल्याच प्रयत्नात अायअायटीत निवड झाली. कर्ज काढून त्यांनी शिक्षण घेतले.
बातम्या आणखी आहेत...