आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asia Third Largest Tunnel In India Pir Panjal Tunnel

आशिया खंडातील तिसरा सर्वात मोठा भुयारी मार्ग, PHOTOS मधून पाहा कशी झाली निर्मीती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान 20 डिसेंबर रोजी होणार आहे. आधीच्या चार टप्प्यांमध्ये विक्रमी मतदान झाले आहे. त्याचा फायदा कोणाला मिळतो हे लवकरच कळेल. सर्वच राजकीय पक्षांनी विकासाचा दावा करत मते मागितली आहेत. या दरम्यान दहशतवादी घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना दहशतवादी घटनांमुळे पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. मात्र, अनेक संकटांवर मात करुन काही योजना पूर्णत्वास गेल्या आहेत. त्यापैकीच एक पीर पंजाल भुयारी रेल्वेमार्ग.
डोंगर कापून तयार केला मार्ग
जम्मू-काश्मीरमधील पीर पंजाल पर्वत रांगांमधून हा भूयारी मार्ग जातो. यासाठी या पर्वतांना कापावे लागले आहे. याला बनिहाल टनेल देखील म्हटले जाते. याची लांबी 11.215 किलोमीटर आहे. जम्मू-काश्मीरच्या पीर पंजाल येथील हा भुयारी मार्ग काश्मीर खोर्‍याला जम्मूच्या बनिहाल गावाला जोडतो.
पर्यायी भूयारी मार्गही तयार
या भुयारी मार्गाची निर्मीती हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने (एचसीसी) केली आहे. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूंनी आणखी एक छोटा भुयारी मार्ग आहे. ज्याचा उपयोग एखाद्या आपत्तीच्या काळात करता येईल, अशी योजना आहे. भुयारातून रल्वेप्रवास सुरक्षीत व्हावा यासाठी अत्याधूनिक सुविधांचा वापर करुन तयार केलेला फायर अलार्म आणि इतर उपकरणे आहेत. बनिहाल रेल्वे स्टेशन येथे एक नियंत्रण कक्ष देखील आहे, जेथून या भुयारी मार्गाच्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवले जाते. रेल्वे ट्रॅकला लागूनच सहा मीटर रुंदीचा एक रस्ता देखील तयार करण्यात आलेला आहे.
काही महत्त्वाच्या बाबी
11 किलो मीटर लांबी
200 सीसीटीव्ही कॅमेरे
7 वर्षांमध्ये भुयारी मार्ग तयार
25 फोन बुथ तयार करण्यात आले
1300 कोटी रुपये खर्च
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसा तयार झाला भूयारी मार्ग