आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री शेतात बसले होते Couple, हल्लेखोराने प्रियकराला मारली गोळी, प्रेयसीवर बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर (छत्तीसगड)- काल रात्रीच्या सुमारास एक कपल शेतात गप्पा मारत बसले होते. यावेळी एका हल्लेखोराने प्रियकराची गोळी मारुन हत्या केली. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून प्रेयसीवर बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
प्रियकराच्या पाठित मारली गोळी
- 24 वर्षीय युवराज चव्हाण काल रात्री आठच्या सुमारास प्रेयसीला घेऊन छेरीखेडी येथून नवीन रायपूर येथे आला.
- मेन रोडपासून साधारणपणे अर्धा किलोमीटर दूर असलेल्या एका शेतात दोघे गप्पा मारत बसले.
- या दरम्यान हल्लेखोर एवढा सावधपणे शेतात शिरला की दोघांना काहीच समजले नाही.
- त्याने जवळून युवराजच्या पाठीत गोळी मारली. एकाच गोळीत तो मृत्युमुखी पडला.
- त्यानंतर तरुणीला बंदुकीचा धाक दाखवला. तिच्यावर शेतातच बलात्कार केला.
- घटनेनंतर हल्लेखोर पळून गेला. तरुणी अल्पवयीन आहे.
तरुणीच्या माजी प्रियकरावर संशय
- युवराज आणि त्याच्या प्रेयसीचे घर शेजारीच आहे.
- घटनास्थळी बिअर आणि दारुच्या बाटला सापडल्या आहेत.
- या घटनेमागे तरुणीचा माजी प्रियकर असावा असा संशय पोलिसांना आहे.
हल्लेखोर पळाल्यानंतर तरुणी आली रस्त्यावर
- घटना घडल्यानंतर तरुणी धावत रस्त्यावर आली. तेथून जात असलेल्या एका दुचाकीस्वाराला थांबवले. त्याला सगळी हकिकात सांगितली.
- दुचाकीस्वाराने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस आयुक्त संजीव शुक्ला यांच्या नेतृत्वात पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
- मध्यरात्री नाकाबंदी करण्यात आली. पण हल्लेखोर सापडला नाही.
पुढील स्लाईडवर बघा... अल्पवयीन तरुणी आणि युवराज चव्हाणचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...