गुवाहाटी (आसाम) – माजी राष्ट्रपती ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाने देशात सात दिवशीय राष्ट्रीय दुखवटा आहे. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी काल (बुधवार) आदिवासी युवतींसोबत नृत्य केले आणि गोल्फही खेळले. याचा व्हीडिओ व्हायरल झाल्याने गोगाई यांच्यावर टीकेची झोड उडाली. त्यानंतर गोगाई यांनी आपली चूक कबुली केली. मात्र, गोल्फ खेळण्याचे समर्थन केले.
कुठे केला डान्स
असाममधील गोलाघाट जिल्ह्यात हातिखुली हॉस्पिटलच्या उद्धाघाटनासाठी मुख्यमंत्री गेले होते. त्या ठिकाणी डान्स करत असलेल्या आदिवासी युवतींसोबत त्यांनी डान्स केला. त्यानंतर न्यू मिसा क्लबमध्ये त्यांनी गोल्फ कोर्सचे उद्घाटन केले. यात गोल्फ स्टिकने शॉट्ससुद्धा मारले.
चूक कबूल केली
व्हीडियो वहायरल झाल्याने गोगोई यांच्यावर मोठी टीका झाली. त्यानंतर आपण नृत्य करून चूक केली, अशी कबुली त्यांनी दिली. शिवाय या बाबत देशाची माफी मागितली. मात्र, गोल्फ खेळण्याचे त्यांनी समर्थन केले.
बीजेपीने केली टीका
आसममधील बीजेपीचे अध्यक्ष सिद्धार्थ भट्टाचार्य म्हणाले, ''शनिवारी गोगोई यांचे जवळचे मित्र तथा माजी मंत्री बी. के. हांडिक यांचे निधन झाले. त्यानंतर सोमवारी माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचे निधन झाले. कलाम यांच्या निधनाने देशात दुखवटा आहे. असे असताना मुख्यमंत्री डान्स आणि गोल्फमध्ये व्यस्त आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटो...