आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assam Chief Minister Tarun Gogois Convoy Attacked By Protesters

आसामचे मुख्यमंत्री गोगोई यांच्या ताफ्यावर हल्ला, संतप्त आंदोलकांनी केली दगडफेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी- आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या ताफ्यावर काही आंदोलकांनी हल्ला केला. नागालॅंडच्या सीमेवरील गोलाघाट जिल्ह्यात ही घटना घडली. तरुण गोगोई हे सोमवारी सकाळी उरियमघाटच्या दौर्‍यावर निघाले असताना ही घटना घडली. गोगोई यांना कुठलीही दुखापत झाली नसल्याचे अतिरिक्त पोलिस आयुक्त (कायदा व्यवस्था) ए.पी. राउत यांनी सांगितले.

राउत म्हणाले, मुख्‍यमंत्री गोगोई हे उरियमघाटमधील एका शिबिराजवळ पोहोचले. तिथे उपस्थित असल्याचे संतप्त आंदोलकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच सुरक्षा रक्षकांवर तुफान दगडफेक केली. यात गोगोई यांच्या ताफ्यातील दोन वाहनांची मोठे नुकसान झाले. आंदोलकांन शांतता पाळण्याचे आव्हान केले. परंतु ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे पाहून पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला. गोगोई यांच्या ताफ्यातील गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गोगोई यांनी झेड प्लस सुरक्षा व्यवस्था आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, संतप्त आंदोलकांनी केले मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

(फाइल फोटो: आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई)