आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाम कोर्टाकडून राहुल गांधी यांना आरोपी म्हणून समन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीच्या एका प्रकरणात आरोपी म्हणून न्यायालयासमोर हजर व्हावे लागणार आहे. आसामच्या कामरूपच्या महादंडाधिकाऱ्यांनी त्यांना २९ सप्टेंबर रोजी हजर होण्याचे समन्स पाठवले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी बारपेटाच्या वैष्णव मठात प्रवेश करण्यास मनाई केली होती, असा आरोप राहुल यांनी केला होता.

१२ डिसेंबर २०१५ रोजी आपणास वैष्णव मठात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होते, असे राहुल यांचे म्हणणे होते. संघाचे कार्यकर्ता अंजन बोडा यांनी त्यावर राहुल यांच्या विरोधात फौजदारी बदनामीचा खटला दाखल केला होता. राहुल यांना १२ डिसेंबर २०१५ रोजी मठात जायचे होते. परंतु ते नियोजित वेळेत पोहचले नाही. ते पदयात्रेत सहभागी झाले. दोन दिवसानंतर त्यांनी दिल्लीतून हा आरोप केला. मठाने नेमणूक केलेले सदस्य व संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांना आत प्रवेश करण्यास मनाई केली. परंतु बोडा यांना राहुल यांचा आरोप बिनबुडाचा आहे, असे म्हटले आहे. आरोपात तथ्य नाही. उलट राहुल यांच्या नियोजित भेटीमुळे मठाने नियुक्त केलेले सदस्य व लोक त्यांची प्रतीक्षा करत होते. परंतु ते आले नाहीत. राहुल यांनी दिल्लीतून केलेले आरोप केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत.दरम्यान, वैष्णव पंथाचा हा मठ १६ व्या शतकातील आहे.

सुप्रीम कोर्टातही प्रकरण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असे एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही सुरू आहे. महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने केली होती, असा आरोप राहुल यांनी केला होता. त्या प्रकरणात माफी मागावी अन्यथा बदनामीच्या खटल्यास सामोरे जावे, असे सर्वोच्च न्यायालयाने १९ जुलै रोजी सुनावले होते. ६ मार्च २०१४ रोजी भिवंडीतील एका सभेत त्यांनी हा आरोप केला होता. संघाच्या एका शाखेचे राजेश कुंटे यांनी त्यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात हा खटला दाखल केला होता. राहुल यांच्या आरोपामुळे संघाची प्रतिमा मलिन झाल्याचे कुंटे यांनी याचिकेत नमूद केले. अलीकडे राहुल यांनी जाहीरपणे संघावर टीका करून वाद आेढवून घेतला आहे.
अनेक साक्षीदारांचे जबाब
न्यायालयाने मठाकडून नेमणूक करण्यात आलेले सदस्य व अनेक साक्षीदारांचे जबाब ऐकल्यानंतर राहुल यांना आरोपी म्हणून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य न्यायदंडाधिकारी संजॉय हजारिका यांनी हे आदेश दिले. कलम ५०० नुसार दोषी आढळून आल्यास दोन वर्षांची कैद व दंड होऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...