(फोटो- गुवाहाटीतील रस्त्यांवर कमरेपर्यंत पाणी साचले आहे.)
गुवाहाटी (आसाम)- आसाममध्ये दमदार पाऊस झाला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आसाममधील अनेक शहरे आणि गावांमध्ये पूराचे पाणी भरले आहे. पावसाशीसंबंधित घटनांमुळे आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या शासकीय निवासस्थानाजवळ भूस्खलन झाल्याने तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. गुवाहाटी जिल्ह्यातील राजगड आणि तरुणनगर सर्वांधिक प्रभावित झाले आहेत.
आकड्यांमध्ये जाणून घ्या-
9500 लोक सोनितपूर येथील निर्वासित शिबिरांमध्ये राहत आहेत.
4 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर झाली आहे.
30 हजार लोक प्रभावित झाले आहेत.
43 गावे रिकामे करण्यात आली आहेत.
पुढील स्लाईडवर बघा, आसाममधील पूर परिस्थिती...