आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Assam Minister Says People Suffered Cancer Because Of Their Sins This Is Divine Justice

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एखाद्याला कॅन्सर होणे, हे त्याच्या माय-बापांच्या पापांचे फळ; आसामात बरळले भाजप मंत्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी - आसामचे आरोग्य मंत्री हेमंत बिस्व सर्मा यांनी कॅन्सरवर केलेल्या वादग्रस्त विधानावर देशभरातून टीका केली जात आहे. एखाद्या व्यक्तीला कॅन्सर होणे, हे त्याच्याच कर्मांचे फळ असते असे सर्मा यांनी बरळले आहे. हा ईश्वराचा न्याय असतो असेही ते पुढे म्हणाले आहेत. पी. चिदंबरम यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. "कॅन्सरला ईश्वराचा न्याय म्हणणारे आसामचे आरोग्य मंत्री आहेत. पाहा, जेव्हा एखादा व्यक्ती पक्ष बदलतो तेव्हा तो असा होतो."

 

आणखी काय म्हणाले आसामचे मंत्री...
> वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सरमा बुधवारी गुवाहाटी येथे शिक्षकांना नियुक्तीचे पत्र वाटत होते. त्याचवेळी ते म्हणाले, "जेव्हा आपण पाप करतो, ईश्वर त्याची शिक्षा देतो."
> "कधी-कधी आपण पाहतो, युवकांनाही आजार जडतात. जुन्या गोष्टी पाहिल्यास तो ईश्वराचा न्याय असल्याचे लक्षात येईल. दुसरे काहीच नाही. आपण जे काही भोगतो तो ईश्वराचाच न्याय आहे."

 

आई-वडिलांच्या पापांचेही फळ
> सरमा पुढे म्हणाले, "आपल्या पूर्व जन्मी किंवा माय-बापाने केलेल्या वाइट कामांचेही फळ भोगावे लागतात. असेही होऊ शकते की एखाद्या युवकाने काहीही पाप केले नाही. मात्र, त्याच्या वडिलांनी काही तरी पाप केले असावेत. कर्मांचे फळ मिळते, हे बायबल आणि भागवद्गीतेत सुद्धा लिहिले आहे." 
> "यात दुखी होण्यासारखे काहीच नाही. आपण जसे जगतोय, तो आपल्या कर्मांचे फळ आहे. ईश्वराच्या न्यायापासून कुणीच वाचलेला नाही."

 

बातम्या आणखी आहेत...