आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assam Nagaland Border Violence: Three Killed In Fresh Clashes, PM Seeks Report From Home Ministry

आसाम-नागालॅंडच्या सीमेवर पुन्हा भडकली ‍हिंसा, तिघांचा मृत्यू, मोदींनी मागितला अहवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी- आसाम- नागालॅंडच्या सीमेवरील गोलाघाटमध्ये आज (बुधवार) पुन्हा हिंसा भडकली. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्रालयाकडून अहवाल मागितला आहे.
दुसरीकडे, गोलाघाट येथे गेल्या आठवड्यात भडकेल्या हिंसेने आतापर्यंत 15 जणांचा बळी घेतला आहे. आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी याप्रकरणाचे खापर केंद्र सरकारच्या डोक्यावर फोडले आहे. मोदी सरकारने योग्यवेळी राज्य सरकारला सहकार्य केले असते तर ही परिस्थिती उद्‍भवली नसती, असेही गोगोई यांनी म्हटले आहे.

मिळालेली माहिती अशी की, गोलागाटमध्ये बुधवारी दुपारी पुन्हा हिंसा भडकल्याने पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात दोघांचा घटनास्थळी तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने नॅशनल हायवे क्रमांक 37 वर ठिय्या आंदोलन केले. टायर जाळून महामार्ग बंद पाडण्याचाही प्रयत्न केला. आंदोलकांनी दोन ट्रक तर एक पोलिस जीपही पेटवली. मुख्‍यमंत्री तरुण गोगोई यांच्या विरोधात जमावाने प्रचंड घोषणाबाजी केली.

दरम्यान, गोलाघाटमध्ये मंगळवारी (19 ऑगस्ट) आंदोलकांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली होती. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापरही केला होता.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, मंगळवारी भडकलेल्या हिंसेची छायाचित्रे...