आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assam Terrorist Attack News In Marathi, Firing, Divya Marathi

अतिरेकी हल्ल्यात आसाममध्ये 23 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - आसामच्या दोन जिल्ह्यांत 24 तासांत अतिरेक्यांनी केलेल्या दोन भयंकर हल्ल्यांत 23 लोक ठार झाले. 14 लोक गंभीर जखमी आहेत. अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार करून घरांना आग लावली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच प्रशासनाने लष्कराला पाचारण केले.
‘एनडीएफबीएस’ या अतिरेकी संघटनेच्या सुमारे 40 सशस्त्र लोकांनी शुक्रवारी पहाटे कोक्राझार जिल्ह्यातील बालापार गावात अल्पसंख्याकांच्या काही घरांवर हल्ला केला. गुरुवारी रात्री उशिरा अतिरेक्यांनी बकसामध्ये असाच हल्ला केला होता. मृतांमध्ये तीन मुले व चार महिलांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर लोकांनी दोन्ही गावे सोडून धुबरी येथे आश्रय घेतला. बोडोलँड नेत्या प्रमिला ब्रह्मा यांच्या वक्तव्यामुळेच हिंसाचार भडकल्याचा दावा अल्पसंख्याकांनी केला.