आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assam Violence News In Marathi, Caste Violence, National Investigation Agency

ह‍िंसाचार होण्‍याच्या भीतीने आसामध्‍ये हजारो नागरिकांनी सोडले घरदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुवाहाटी - आसाममधील जातीय हिंसाचाराच्या घटनेची एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेकडून चौकशी करण्यात येईल, असे राज्य सरकारने शनिवारी स्पष्ट केले. घटनेतील मृतांचा आकडा 32 वर गेला असून तीन जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर आणखी हिंसाचार होण्याच्या भीतीने हजारो नागरिकांनी घरदार सोडून पलायन केले.

नारायणगुडी गावात आणखी नऊ मृतदेह आढळून आले. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. बाकसा जिल्ह्यातील मनस राष्ट्रीय उद्यान परिसरात हे गाव आहे. नक्षलवाद्यांनी आनंद बाजार भागातील एका कुटुंबातील तीन जणांची हत्या केल्यानंतर हा हिंसाचार उफाळून आला. त्यानंतर दुस-या बंडखोर गटाने कोक्राझार जिल्ह्यात शुक्रवारी हिंसाचार केला. त्यात आठ नागरिकांचा मृत्यू झाला, तर अनेक जखमी झाले.शुक्रवारी रात्रीदेखील मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता.
पाच महिला आणि एका मुलाला गोळी चाटून गेल्याने ते जखमी झाले.नानकेखाद्राबारी आणि नयनागुडी गावात अनेक झोपड्यांना पेटवून देण्यात आले, परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली.