आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक मैदानात नव्वदी ओलांडलेल्या नेत्यांचा उत्साह शिगेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये ९० वर्षांपेक्षा अधिक वयाचे चार चेहरे सक्रिय आहेत. यामध्ये केरळचे मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन आणि तामिळनाडूमध्ये एम. करुणानिधी मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. पश्चिम बंगालमध्ये ज्ञानसिंह सोहनपालविरुद्ध भाजपने प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना मैदानात उतरवले आहे. केरळच्या के.आर. गौरीअम्मा यांना सोबत घेण्याचा विचार सर्व आघाड्या करत आहेत.

करुणानिधी
वय: 92 वर्षे
१९५७ नंतर एकही निवडणूक हरले नाहीत

संन्यासापासून माघार, पुन्हा नव्या जोमाने रिंगणात

करुणानिधी १३ वेळेस आमदार आणि सहा वेळा मुख्यमंत्री होण्यासाठी तिरुवरूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. २००९ मध्ये त्यांच्यावर मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तेव्हापासून ते व्हीलचेअरवर बसून राजकारण करत आहेत. राज्यातील २६ ठिकाणी सभा घेणार आहेत. १९५७ नंतर ते कोणतीच निवडणूक हरले नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने सपाटून मार खाल्ल्यानंतर लोकांनी वृद्ध खांद्यावरील भार काढल्याचे सांगण्यात आले होते. त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहेत. पुत्र स्टॅलिन यांना मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले जाईल, असे मानले जात होते. मात्र, तसे झाले नाही. योगा करणे हे यशाचे रहस्य असल्याचे करुणानिधी यांचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, अच्युतानंदन फेसबुकवर ५ दिवसांत १ लाख लाइक्स, ठरले स्टार प्रचारक