आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Election : Voting Begins In Jharkhand And Jammu & Kashmir

झारखंडमध्ये गालबोट, दोन बॉम्ब सापडले एका उमेदवारावर गोळीबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर/रांची - विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झारखंडच्या 13 जागांसाठी तर जम्मू-काश्मीरमध्ये 15 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यान, झारखंडच्या पलामू येथील हरिहरगंजमधून दोन कॅन बॉम्ब मिळाल्याची माहिती आहे. तर पलामूमध्येच नौजवान संघर्ष मोर्चाच्या उमेदवारावर फायरिंग झाली असून ते बालंबाल बचावल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर जम्मू काश्मीरमध्येही बांदीपूर जिल्ह्यात एक स्फोट झाला आहे. यास्फोटाची क्षमता कमी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे समोर आले आहे.
झारखंडमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या 13 ठिकाणी एकूण 199 उमेदवार रिंगणात आहेत. अप्पर मुख्य निवडणूक अधिकारी हिमानी पांडेय यांनी सांगितले की, मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न व्हावी यासाठी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. इथर राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी पीके जाजोरिया यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळी दहापर्यंतची मतदानाची टक्केवारी (झारखंड)
लातेहार - 14.83
मनिका - 19.19
छतरपूर - 13
पलामू - 11.5
पांकी - 16
हुसैनाबाद - 11
चतरा - 12
गुमला - 9
एकूण सरासरी - 12.6
जम्मू काश्मीरमध्येही सकाळच्या सत्रात सुमारे 14 ते 15 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे.
प्रथमच मोठा फौजफाटा
विधनसभा निवडणुकीसाठी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सुमारे दहा ते बारा पॅरा मिलिटरी दल तैनात करण्यात आले आहेत. डीजीपी राजीव कुमार म्हणाले की, झीरो व्हॉयलेंस (हिंसाचार मुक्त) निवडणुकांसाठी प्रशासनाने या माध्यमातून कंबर कसली आहे. एअर अँब्युलेंसची व्यवस्थाही करण्यात आली आहे. एखाद्या ठिकाणी काही अप्रिय घटना घडल्यास एका तासात ही एअर अँब्युलेन्स रांचीला पोहोचेल.

येथे होत आहे मतदान
चतरा (एससी), गुमला (एसटी), बिशूनपूर (एसटी), लोहरदगा (एसटी), मनिका (एसटी), लातेहार (एससी), पांकी, डालटनगंज, विश्रामपूर, छतरपूर (एससी), हुसैनाबाद, गढवा आणि भवनाथपूर

यांची प्रतिष्ठा पणाला
के.एन.त्रिपाठी, सुखदेव भगत, कमल किशोर भगत, गिरिनाथ सिंह, सुधा चौधरी, राधाकृष्ण किशोर, चमरा लिंडा, विदेश सिंह, कमलेश सिंह, रामचंद्र केसरी, भानुप्रताप शाही आणि दिलीप सिंह नामधारी सह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा यावेळी पणाला लागली आहे.
263 बूथचे थेट प्रक्षेपण
पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 263 बूथवरून मतदानाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. निवडणूक आयोग आणि सरकारच्या वेबसाईटवर हे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
पुढील स्लाइडवर वाचा, जम्मू काश्मीरमध्ये मतदार बनला 'राजा'