आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assignment That Kalam Could Not Give To Iim Students

कलामांसाेबतच्या अंतिम क्षणातील 8 किस्से, विद्यार्थ्यांना विचारणार होते हा 1 प्रश्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्सनल असिस्टंट सृजन पाल सिंह आणि एपीजे अब्दुल कलाम. - Divya Marathi
पर्सनल असिस्टंट सृजन पाल सिंह आणि एपीजे अब्दुल कलाम.
नवी दिल्ली - डॉ. एपीजे अब्दुल कलाम IIM शिलाँगच्या विद्यार्थ्यांना लेक्चरनंतर एक प्रश्न विचारणार त्याआधीच बेशुद्ध झाले. ती त्यांची विद्यार्थ्यांबरोबरची अखेरची भेट ठरली. माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या सोमवारी अशा अचानक जाण्याने त्यांचे पर्सनल असिस्टंट सृजन पाल सिंह सोमवारी रात्रभर बेचैन होते. सहा वर्षांपासून ते कलाम यांच्याबरोबर होते. मंगळवारी फेसबूकवर त्यांनी एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी डॉ. कलाम यांच्या अखेरच्या दिवसाबाबत माहिती दिली. त्यांना याबाबत आठ किस्से सांगितले. तसेच त्यांनी प्रश्नही सांगितला जो, ते IIM च्या विद्यार्थ्यांना विचारणार होते. सृजनपाल सिंह यांची ही पोस्ट पुढीलप्रमाणे...

अखेरचा सूट...
‘‘अनेक तास झालेत, आम्ही एकमेकांशी बोललेलो नाही... झोप तर जणू हरवली आहे. पुन्हा पुन्हा त्या आठवणी डोळ्यासमोर येत आहेत. त्यांच्या सोबतीला अश्रूही आहेत. 27 जुलैचा आमचा दिवस दुपारी 12 वाजता सुरू झाला होता. आम्ही गुवाहाटीच्या विमानात बसलो. डॉ. कलाम 1ए आणि मी 1सी सीटवर होतो. त्यांनी डार्क कॉलरचा कलाम सूट परिधान केला होता. मी त्यांना कॉम्प्लिमेंट दिले. म्हटले - नाइस कलर! मला काय माहिती की, मी त्यांना पुन्हा त्या सूटमध्ये पुन्हा कधीही पाहू शकणार नाही.’’

‘‘ पावसातच आम्ही अडीच तासांच्या प्रवासानंतर गुवाहाटीला पोहोचलो. खराब वातावरणामुळे जेव्हा विमानाला झटका बसायचा आणि मीही घाबरायचो तेव्हा, डॉ. कलाम खिडकी खाली करायचे आणि म्हणायचे, आता तुम्हाला भीती वाटणार नाही. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर पुढे आणखी अडीच तास प्रवास करून आम्ही शिलाँगला पोहोचलो. पाच तासाच्या या प्रवासादरम्यान आम्ही अनेक मुद्यांवर चर्चा केली, वादविवादही केला. गेल्या सहा वर्षात शेकडो वेळा आम्ही विमानात आणि नंतर गाडीने सोबत प्रवास केला होता. प्रत्येक वेळेप्रमाणे यावेळी केलेला प्रवासही तेवढाच खास होता. ’’

किस्सा 1 : अशाने तर 30 वर्षांत पृथ्वी राहण्यायोग्यही नसेल...
‘‘या प्रवासात आम्ही तीन मुद्यांवर चर्चा केली. सर्वात आधी - डॉ. कलाम पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे चांगलेच चिंतेत होते. निरपराधांचे प्राण गेल्याने ते दुखावले गेले होते. IIM शिलाँगमध्ये त्यांच्या लेक्चरचा मुद्दा होता, क्रिएटिंग ए लिव्हेबल प्लॅनेट अर्थ. त्यांनी पंजाबमध्ये झालेल्या हल्ल्याशी संदर्भ जोडून विचार केला आणि म्हणाले, प्रदूषणाप्रमाणे मानवही पृथ्वीसाठी सर्वात मोठा धोका बनले आहेत. हिंसाचार, प्रदूषण आणि जनतेच्या बेलगाम वर्तणुकीमुळे एक दिवस ही पृथ्वी आपल्यापासून दूर जाईल याबाबत आम्ही चर्चा केली. डॉ. कलाम म्हणाले, बहुधा 30 वर्षांत पृथ्वी राहण्यायोग्यही नसले. तुम्ही याबाबत काहीतरी करायला हवे. त्यातच तुमचे भविष्य लपलेले आहे.’’
पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी 7 किस्से...
सर्व फोटो सृजनपाल यांच्या फेसबूक पेजवरून साभार...