आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रह्मांडाचे गूढ: भारतीय 'अॅस्ट्रोसॅट'ला अंतराळात 100 दिवस पूर्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - ब्रह्मांडाचे गूढ उकलण्यासाठी जगभरातील अभ्यासकांनी वर्षानुवर्षे प्रयत्न चालवले आहेत. यात भारतही मागे नाही. आधुनिक युगात भारताने हे रहस्य जाणून घेण्यासाठी अंतराळात पाठवलेल्या अॅस्ट्रोसॅट उपग्रहाने अवकाशात १०० दिवस पूर्ण केले आहेत.
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) गेल्या सप्टेंबर महिन्यात अॅस्ट्रोसॅट उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते. इस्रोने जारी केलेल्या एका पत्रकानुसार, आतापर्यंत या उपग्रहाचे कार्य सुव्यवस्थित असून या मोहिमेतून आणखी बरीच माहिती मिळू शकेल. या उपग्रहाच्या माध्यमातून मिळत असलेल्या माहितीबाबत इस्रोचे शास्त्रज्ञ समाधानी असून अपेक्षेनुसार हा उपग्रह कार्यरत असल्याबद्दल या सर्वांत एकमत आहे.

विशेषत: अंतराळात होणाऱ्या घडामोडी व कृष्णविवरांबाबतची माहिती मिळवणे हे या मोहिमेचे उिद्दष्ट असून आजवर मिळालेली माहिती अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे इस्रोने म्हटले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावरून गेल्या २८ सप्टेंबर रोजी या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. १५१३ किलो वजनाचा हा उपग्रह खगोल विज्ञानाच्या अभ्यासाच्या दृष्टीने भारताने पाठवलेला पहिला उपग्रह आहे. या माध्यमातून अमेरिका, युरोपियन युनियन आणि जपाननंतर असा उपग्रह पाठवणारा भारत चौथा देश ठरला होता.
अॅस्ट्रोसॅट आहे काय?
भारताचा हा उपग्रह म्हणजे एक प्रयोगशाळा आहे. या माध्यमातून पृथ्वीवर हाेत असलेल्या बदलांचा अभ्यास करण्यात येणार असून अवकाशातील क्ष-किरणे, विद्युत चुंबकीय लहरींसह इतर प्रवाहांचा अभ्यास केला जाईल. शिवाय मल्टी वेव्हलेंथ ऑब्झर्व्हेटरीच्या माध्यमातून ताऱ्यांमधील अंतरही जाणून घेतले जाईल.