आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारी बाबाच्या डेरामध्ये कधीही सर्च मोहिमेला सुरुवात; 32 अधिकाऱ्यांचे पथक रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिंद- साध्वींच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आराेपी डेरा प्रमुख राम रहीम याच्या डेऱ्यामध्ये कधीही सर्च मोहीम सुरू होऊ शकते. यासाठी पोलिस महासंचालक (हिस्सार) यांनी जिंदसह इतर भागांतील सर्व जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना सिरसा येथे पाठवण्याचे आदेश दिले आहेत. जिंद येथून सुमारे ३२ अधिकाऱ्यांचे पथक सिरसा येथे रवाना होत आहे, तर जिल्हा पोलिस प्रशासनाने आम्हाला तयार राहा, असे आदेश दिल्याचे सांगितले. आदेश मिळताच पोलिस फौजफाटा डेराकडे रवाना होईल. दरम्यान, आणखी ११० डेरा समर्थकांना डेऱ्यातून बाहेर काढण्यात आले. 

जिंदच्या पोलिस अधीक्षकांची खास नियुक्ती
राम रहीम यास २५ ऑगस्ट रोजी सिरसा येथील डेऱ्यातून सुनावणीस नेण्यासाठी जिंदचे पोलिस अधीक्षक डॉ. अरुणसिंग यांची विशेष नियुक्ती करण्यात आली. पोलिस महासंचालकांसोबत त्यांनी बाबाला न्यायालयात नेले होते. 
बातम्या आणखी आहेत...