आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • At DRDO Function PM Modi Says Big Challenge Is How We Complete Work Before Time

जग 2020 मध्ये करेल, ते 2018 मध्येच करा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शास्त्रज्ञांना सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : डीआरडीओच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी.

नवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी डीआरडीओच्या (लष्करी संशोधन आणि विकास संस्था) शास्त्रज्ञांना संबोधित केले. वेळेच्या आधीच काम पूर्ण करणे हे आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच सीमेवर तैनात असणा-या जवानांचा विचार करून अधिकाधिक काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

नवनवीन कल्पना समोर याव्या साठी शास्त्रज्ञांनी तरुणाईबरोबर संवाद साधण्याची गरज असल्याचे मतही मोदी यांनी व्यक्त केले. यावेळी पंतप्रधानांनी तरुण शास्त्रज्ञांसाठी एका स्वतंत्र प्रयोगशाळेची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा मुद्दाही उपस्थित केला. संरक्षणमंत्री अरुण जेटली हेही मोदींबरोबर कार्यक्रमाला उपस्थित होते.

वेळेच्या पुढे धावण्याची गरज
पंतप्रधान मोदी शास्त्रज्ञांना म्हणाले, 'आज जग अत्यंत वेगाने बदलत आहे. त्यामुळे वेळेच्या पूर्वीच काम पूर्ण करणे हे आपल्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. जे काम (संशोधन) जगात 2020 ला पूर्ण होणार असेल, ते आपण 2018 मध्येच पूर्ण करायला हवे', अशा शब्दांत मोदींनी आपले मत मांडले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मोदींनी मांडलेली विविध मते,,,