आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटल माझे कृष्ण, मी त्यांचा सुदामा; अशी होती वाजपेयी आणि शैवाल यांची फ्रेंडशिप...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या लहानपणीचे मित्र शैवाल सत्यार्थी यांच्यासमोर फ्रेंडशिप डे चा उल्लेख करताच ते भावूक झाले. शैवाल म्हणाले, ते माझ्यासाठी कृष्ण आणि मी त्यांचा साहित्यजिवी मित्र सुदामा आहे. शैवाल यांनी नुकतीच वाजपेयींची भेट घेतली होती. त्यांची अवस्था पाहून आपल्याला खूप दुख झाले. पांघरून झोपलेले अटलजी यांना काहीही लक्षात नाही. त्यांना स्मृतीभ्रंश झाला आहे. तरीही अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी आपल्याला ओळखले हे शैवाल अतिशय आनंदाने सांगतात. 
 

वाजपेयींनी शिकवला मैत्रीचा अर्थ
- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे जगभरात असंख्य मित्र असतील. मात्र, लहानपणी त्यांच्या मित्रांबद्दल बोलावयाचे झाल्यास सर्वप्रथम मनराखन मिश्र आणि शैवाल सत्यार्थी यांची नावे डोळ्यासमोर येतात. शैवाल यांनी फ्रेंडशिप डे चा विषय निघाल्यानंतर आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या.
- वाजपेयी शैवाल यांच्यापेक्षा वयाने मोठे होते. मात्र, शेजारीच असल्याने दोघांची मैत्री झाली. वाजपेयी ज्या-ज्या शिक्षण संस्थांमध्ये शिकले, त्याच ठिकाणांवरून शैवाल यांनीही शिक्षण पूर्ण केले. प्रत्येकवेळी मित्राचे समर्थन करणे म्हणजे मैत्री नव्हे. तर, मित्राने वाईट केल्यास त्याला खरा मार्ग दाखवणे खरी मैत्री आहे, अशी शिकवण त्यांनी शैवाल यांना दिली होती. 
- शैवाल यांनी सांगितल्याप्रमाणे, तत्कालीन VC (आता हरि-दर्शन शाळा) शाळेत वाजपेयी त्यांचे सीनियर होते. एका वाद-विवाद स्पर्धेत त्यांना जज बनवण्यात आले होते. शैवाल यांनीही त्यामध्ये सहभाग घेतला होता. मात्र, एका मुलीशी वाद-विवाद करताना शैवाल लाजत होते. वाजपेयी असल्याने आपली चूक दुर्लक्षित करतील अशी शैवाल यांना अपेक्षा होती. मात्र, वाजपेयी यांनी शैवाल यांना चक्क '0' दिला. विचारल्यानंतर वाजपेयी म्हणाले, जर तुला काठी दिली तर आयुष्यभर अपंग होशील. 
 

वाजपेयी कृष्ण, मी सुदामा -शैवाल
- शैवाल सत्यार्थी यांनी सांगितल्याप्रमामे, अटल बिहारी वाजपेयी राजकारणाच्या शिकरावर पोहोचल्यानंतरही आपल्या लोकांसाठी अगदी सामान्य होते. पहिल्यांदा जेव्हा ते पंतप्रधान होऊन ग्लाल्हेरच्या दौऱ्यावर आले, त्यावेळी मनराखन आणि मला खास निमंत्रण देऊन बोलावले. घरी बनवलेले जेवण मागवले आणि आमच्या सोबत बसून त्यांनी ते खाल्ले होते.
- शैवाल यांना नुकताच हृदयविकाराचा झटका बसला होता. वेळीच उपचार झाल्याने ते आता बरे आहेत. 6 महिन्यांपूर्वीच  वाजपेयींची भेट घ्यावी अशी खूप इच्छा झाली. त्यावेळी शैवाल दिल्लीला पोहोचले आणि वाजपेयींना भेटण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी पाठवलेल्या पत्रावर अटल बिहारी वाजपेयी यांची देखरेख करणारे झींगटा हाताळत होते. त्यांनी शैवाल यांचे नाव वाचताच बोलण्यात अडथळा येत असतानाही वाजपेयींना हातवारे करत त्यांना त्वरीत बोलावण्याचे निर्देश दिले.
 

वाजपेयींना भेटलो तेव्हा...
- शैवाल जेव्हा वाजपेयींच्या रूममध्ये दाखल झाले, तेव्हा ते एका बेडवर पांघरून झोपलेले होते. वाजपेयींची अवस्था पाहून शैवाल हादरले आणि जागेवर थांबले. झींगटा यांनी पुढे येण्याचे आवाहन केले तेव्हा ते सावरले. 
- शैवाल म्हणाले, 'सूर्य सारखा तेजस्वी माझा मित्र असा बेडवर पडलेला पाहून मी शून्यात गेले होतो. झींगटा यांनी हाक मारल्यानंतर मी थोडासा सावरलो आणि पुढे सरकलो. त्यातच माझे नाव ऐकून वाजपेयी जागी झाले. त्यांनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाने स्मितहास्य फुलले. 
- स्मृतीभ्रंश झाला असतानाही ते मला विसरले नाहीत. यावर झींगटाजींनी आश्चर्य व्यक्त केला. आणि म्हणाले, कित्येक वर्षांनंतर आपल्या व्यक्तीला पाहून अटलजींच्या चेहऱ्यावर हास्य फुलताना पाहिले आहे. त्यावेळी वाजपेयींना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यासह डोळ्यांमध्ये सुद्धा झळकत होता.
 
 
पुढील स्लाईड्सवर, वाजपेयी आणि मित्रांचे काही दुर्मिळ फोटोज...
बातम्या आणखी आहेत...