आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Atali Controversy Again, Doing Kirtan Lashed Stones On Women, Several Injured

बल्लभगडमध्ये तणाव, दगडफेकनंतर 50 मुस्लिम नागरिकांना सोडले गाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटाली येथे तैनात पोलिस कर्मचारी - Divya Marathi
अटाली येथे तैनात पोलिस कर्मचारी
पानीपत/फरीदाबाद - हरियाणातील बल्लभगड येथील अटाली गावात पुन्हा एकदा धार्मिक तणावाचे वातावरण आहे. बुधवारी येथील एका मंदिरात किर्तन करत असलेल्या महिलांवर दगडफेक झाली आणि दोन्ही गट एकमेकांसोमर आले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले, गावातील तणाव लक्षात घेता 700 पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जवळपास 50 मुस्लिम नागरिकांनी गाव सोडले आहे. यात मुले, महिलांचाही समावेश आहे.

याआधी मे मध्ये एका धार्मिक स्थळाच्या बांधकामावरुन गावात तणाव निर्माण झाला होता, तेव्हा दीडशे मुस्लिम कुटुंबांनी गावातून पलायन केले होते.
धार्मिक स्थळावर दगड-विटांचा मारा
अटाली गावातील भोलाने सांगितले, की त्याची पत्नी मुकेश आणि इतर काही महिला मंदिरात किर्तन करत होत्या. तेव्हा दुसर्‍या एका धार्मिक स्थळातून त्यांच्यावर वीटा फेकण्यात आल्या. यात मुकेश आणि इतर महिला जखमी झाल्या. त्यानंतर दोन्ही गट संतप्त होत रस्त्यावर उतरले आणि दगडफेक सुरु झाली. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत केले. जखमी महिलांना बल्लभगड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
आधीही हिंसाचाराने पेटले होते गाव
अटाली गावात दोन महिन्यातील ही दुसरी घटना आहे. 25 मे रोजी एका धार्मिक स्थळाच्या बांधकामावरुन गावकर्‍यांनी मुस्लिम कुटुंबावर हल्ला केला होता. जवळपास 2000 लोक मुस्लिमांवर तुटून पडले होते. त्यांची घरे, दुकाने जाळण्यात आली. त्यानंतर दीडशे मुस्लिम कुटुंबांनी बल्लभगड पोलिस स्टेशनमध्ये आश्रय घेतला होता. 10 दिवस मुला-बाळांसह पोलिस स्टेशनमध्ये राहिल्यानंतर काही दिवसांपूर्वीच ही कुटुंबे गावात परतली होती.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गावात भडकलेल्या हिंसाचारावर नियंत्रण आणताना पोलिस