आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हम हैं अच्छे मित्र, बदल देंगे मंत्रालय का चित्र!, गहलोत यांना एेकवली शीघ्र चाराेळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिपाइं नेते रामदास अाठवले यांनी सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री म्हणून बुधवारी पदभार स्वीकारला, परंतु त्यासाठीही ते अर्धा तास उशिरा पोहोचले. त्यामुळे ताटकळलेले कॅबिनेट मंत्री थावरचंद गहलाेत चांगलेच वैतागले. त्यांची नाराजी पाहून आठवलेंतील कवी जागा झाला. ‘हम हैं अच्छे मित्र, बदल देंगे मंत्रालय का चित्र!’ असे म्हणत त्यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
शास्त्री भवनातील थावरचंद गहलाेत यांच्या कक्षात अाठवलेंचा पदभार घेण्याचा मुहूर्त बुधवारी दुपारी ३ वाजता होता. गहलाेत, विभागातील सचिव, वरिष्ठ अधिकारी व पत्रकार मंडळी दुपारी ३ वाजेपासून अाठवलेंची वाट पाहत बसले. एका बैठकीला जायचे असल्याने गहलोत सतत घड्याळाकडे बघत हाेते. १५-२० मिनिटांनी त्यांचा पारा चढला. ते म्हणाले, ‘बाबासाहेबांनंतर मीच असे म्हणणारे अाठवले त्यांचे वेळेचे भान व शिस्त घेऊ शकले नाहीत. बाबासाहेब वेळा पाळायचे’. अखेर ३.३० वाजता अाठवले आले. ‘उशीर का झाला?’ या पत्रकारांच्या प्रश्नाला अाठवले उत्तर देऊ शकले नाहीत.

राज्यातही वाटा हवा
अाठवले म्हणाले, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंलाही वाटा हवा, अशी आमची भूमिका आहे. परंतु तुमचा एकही अामदार नाही? याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी अन्य एखाद्या अामदाराचा राजीनामा घ्यावा. शिवाय महामंडळांत २५ टक्के वाटा रिपाइं कार्यकर्त्यांना देण्यात यावा.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...