आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगरमध्ये बीएसएफ कॅम्पवर आत्मघाती हल्ला; 4 जवान जखमी, एका दहशतवाद्याचा खात्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीनगर- श्रीनगर विमानतळाजवळ चौपदरी सुरक्षा व्यवस्था भेदून अतिरेक्यांनी बीएसएसफच्या १८२ व्या बटालियनच्या कॅम्पवर मंगळवारी पहाटे साडेचार वाजता आत्मघाती हल्ला केला. सुमारे १० तासांच्या चकमकीनंतर जवानांनी तिन्ही अतिरेक्यांना ठार केले. या घटनेत बीएसएफचे सहायक पोलिस उपनिरिक्षक (एएसआय) बी.के. यादव शहीद झाले. चार जवान जखमी झाले. हल्ल्याची जबाबदारी पाकची अतिरेकी संघटना जैश-ए-मोहंमदने घेतली आहे. दहशतवादाच्या ३० वर्षांत प्रथमच विमानतळाच्या इतक्या जवळ हल्ला झाला आहे. कॅम्प आणि विमानतळाची भिंत एकच आहे. हल्ल्याची तुलना पठाणकोट एअरबेसवर झालेल्या हल्ल्याशी केली जात आहे. त्या हल्ल्यात ७ जवान शहीद आणि सर्व ६ अतिरेकी ठार झाले होते. एअरबेसवरही हल्ला पहाटे साडेतीन वाजता झाला होता. अतिरेक्यांनी लष्करी गणवेश घातलेले होते.  पोलिसांनी सांगितले की, जैश-ए-मोहंमदने नूरा त्राली नावाचे आत्मघाती पथक जम्मूला पाठवले होते. गुप्तहेरांच्या माहितीच्या आधारे या पथकाची ओळख पटवण्यात आली होती. मात्र पुढील माहिती मिळू शकली नव्हती. पडक्या भिंतीच्या मार्गावर चोहोबाजूंनी गोळीबार व ग्रेनेड्स फेकत अतिरेकी कॅम्पमध्ये दाखल झाले. प्रत्युत्तराच्या कारवाईत एक अतिरेकी ठार झाला. अंधाराचा फायदा उचलून अतिरेकी कॅम्पमध्ये घुसले आणि वेगवेगळ्या इमारतींत लपून गोळीबार करू लागले. जवानांनी दुसऱ्या अतिरेक्यालाही टिपले. मात्र, अॅडमिन ब्लॉकमध्ये लपलेल्या तिसऱ्या अतिरेक्याला मारण्यास वेळ लागला. हल्ल्याच्या वेळी बहुतांश जवान झोपलेले होते. 
मोहिमेत बीएसएफसोबत सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसही होते. काश्मीरचे आयजी मुनीर खान यांनी सुरक्षेत त्रुटी असल्याचा दावा फेटाळत अतिरेक्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिले गेल्याचे सांगितले. हल्ल्यामुळे विमान उड्डाणे तीन तास खोळंबून राहिली. सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी देण्यात आली. गतवर्षी १६ ऑगस्टला बीएसएफच्या कुपवाडा व २ ऑक्टोबरला बारामुल्ला कॅम्पवर अतिरेक्यांनी हल्ला केला होता. घटनेनंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आपत्कालीन बैठक बोलवून आढावा घेतला. 
 
जुलै-ऑगस्टमध्ये भारतात घुसले होते 
जैशच्या याच अतिरेक्यांच्या चमूने पुलवामामध्ये काही दिवसांपूर्वी हल्ला केला होता. जोवर पाकिस्तान आपला शेजारी आहे तोवर असे हल्ले होतच राहतील. हे अतिरेकी जुलै-ऑगस्टमध्ये भारतात घुसले होते. त्यांना मदत करणाऱ्या एकाची ओळख पटवण्यात आली आहे. 
मुनीर खान, अायजी काश्मीर
 
हल्ल्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांची घरे
१८२ बटालियनवर श्रीनगर विमानतळाच्या धावपट्टीच्या सुरक्षेच्या जबाबदारी आहे. हा भाग गो-गो लँॅड नावाने परिचित आहे. डांेगराळ भागातील ही छावणी वायुदलाच्या जुन्या एअरफील्ड जवळ आहे. या भागात बीएसएफ व सीआरपीएफच्या प्रशिक्षण छावण्याही आहेत. अतिरेकी सुरक्षा व्यवस्था भेदून विमानतळाच्या निवासी भागात घुसले. येथे अनेक बडे अधिकारी राहतात. हा कॅम्प नेहमीच पाकिस्तानी अतिरेक्यांच्या निशाण्यावर असतो.
 
ऑगस्टपासून आजवर २४ अतिरेकी टिपले
१ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबरपर्यंत २४ अतिरेक्यांना ठार करण्यात आले आहे. ऑगस्टमध्ये १२ व सप्टेंबरमध्ये ४ अतिरेक्यांना टिपले होते. सोमवारीही कुपवाड्यात घुसखोरी करणाऱ्या ५ अतिरेक्यांना मारले होते. २७ सप्टेंबर व २ ऑक्टोबरला अतिरेक्यांनी दोन जवानांची हत्या केली होती. 
बातम्या आणखी आहेत...