कोलकाता- क्रिकेटपटू मोहंमद शमीवर शनिवारी रात्री हल्ला केल्याच्या प्रकरणात सोमवारी पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली. शमी रात्री दौऱ्यावरून परतला होता.घराजवळ पार्किंगवरून हा वाद झाला. क्रिकेट दौऱ्यावर कारने परतल्यानंतर शमी घराच्या प्रवेशद्वाराजवळ थांबला होता. त्याचवेळी गाडी रस्त्यामध्ये पार्क केल्यावरून संतापलेल्या तीन तरुणांनी शमीला अर्वाच्य भाषेत बोलण्यास सुरूवात केली. तिघेही मोटारसायकलवर होते.
काहीवेळाने शमीच्या गाडीला पार्किंगमध्ये लावण्यासाठी गेट उघडण्यात आले. तोपर्यंत हे तिघे शमीला असभ्य भाषेत बोलत होते. काहीवेळाने मात्र ते पळून गेले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना स्पष्ट झाली. आरोपींची जयंता सरकार, स्वरूप सरकार, शिवा प्रमाणिक अशी आेळख पटली.