आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दोन मैत्रीनींचे होते एकाच युवकावर प्रेम, प्रियकराला मिळवण्यासाठी केले असे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीतामढी- येथील एका तरूणीने आपल्या मैत्रीनीच्या शरिरावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे.. हल्यात गंभीर युवतीला उपचारासाठी रूग्नालयात पाठवण्यात आले आहे. हल्लेखोर युवतीच्या मनात प्रियकर मैत्रीनवर प्रेम करू लागेल अशी भीती होती, यामुळेच तिने मैत्रीनीवरच हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे.


64 ठिकाणी केले वार....
- ही घटना सीतामढी जिल्ह्यातील डुमरा पोलिसाठाण्याअंतर्गत येणाऱ्या रिखौली या गावात घडली.
- घटनेच्या दिवशी आरोपी तरूणीने मैत्रीनीला घराजवळ बोलवून घेतले आणि तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर चाकूने अनेक वार केले.
- हल्यानंतर मैत्रीण खाली कोसळी. तिचा मृत्यू झाल्याच्या भीतीने आरोपी तरूणी तेथून पळून गेली.
- परिसरातील लोक जखमी अवस्थेत पडलेल्या मुलीजवळ पोहोचले आणि तिच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली.
- तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, युवतीच्या शरिरावर 64  ठिकाणी वार करण्यात आले आहेत. तिला पाचशे ठिकाणी टाके द्यावे लागले.
- दोन्ही तरूणी एकाच तरूणावर प्रेम करत होत्या आणि यातूनच ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

पुढील स्लाइडवर पाहा, जखमी तरूणीचा फोटो....

बातम्या आणखी आहेत...