आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या कार्यालयावर हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या तामिळनाडूच्या मयिलादुथुरईस्थित कार्यालयावर काही अज्ञात लोकांनी काल हल्ला केला. अय्यर यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. ते तामिळनाडूच्या मयिलादुथुरईमधून लोकसभा निवडणूक जिंकले होते आणि सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. अय्यर यांच्या विधानावर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.