आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉटेल व्यवस्थापकाकडून बलात्काराचा प्रयत्न; ब्रिटिश महिलेने घेतली बाल्कनीतून उडी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा- मध्‍य प्रदेशातील दतियामध्ये एका स्विस महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर आता आग्रा येथे एका ब्रिटिश महिलेवर बलात्‍काराचा प्रयत्न करण्‍यात आला. पीडित महिला एका हॉटेलमध्ये थांबली होती. त्याच हॉटेल व्यवस्थापकाने तिच्यावर बलात्कार करण्‍याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगावधान राखून ब्रिटिश महिलेने बाल्कनीतून उडी घेऊन स्वत:ची अब्रु वाचवली.

पीडित महिला लंडन येथील असून ती भारतात पर्यटनासाठी आली आहे. हॉटेल 'आग्रा महल'मधील रुम नं. 206 मध्ये ती थांबली होती.संबंधित महिला एक दंततज्ज्ञ आहे. ती 17 मार्चला आग्रा येथे पोहचली होती. तिला मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता रेल्वेने जयपूर येथे जायचे होते. परंतु सकाळी चार वाजता आरोपी सचिन चौहान याने तिच्या रुमच्या दरवाज्यावर दस्‍तक दिली. महिलाने दरवाजा उघडला सचिनने तिला 'फ्री हॅन्ड आईल मसाज'ची ऑफर दिली. । त्यावेळी सचिन मद्यधुंद होता. त्याच्या हातात तेलाची बाटली होती. परंतु संबंधित महिलेने त्याला मसाज करण्‍यास नकार दिला. संबंधित महिलेने प्रसंगावधान राखून हॉटेलच्या बाल्कनीतून उडी घेऊन स्वत:चा बचाव केला.

हॉटेल व्यवस्थापक सचिन चौहानच्या विरोधात पर्यटन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. एसएसपी सुभाष चंद्र दुबे यांनी सांगितले की, आरोपी चौहान याला अटक केली आहे.

ब्रिटिश महिलेनी पोलिसांना सांगितले की, पहिल्यांचा तिच्या रुमचा दरवाजा ठोठावण्याचा आवाज आला. त्यांनी मात्र आरोपी‍ सचिनने तिला मसाज सेवेबाबत ऑफर दिली. हे ऐकून ती घाबरली आणि ती बाल्कनीतून उडी घेतली‍ आणि सरळ पोलिस ठाण्यात पोहचली.