आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताेडग्यासाठी शक्तिपरीक्षण आठवडाभरात करा, अॅटर्नी जनरल यांचा राज्यपालांना सल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई/ नवी दिल्ली - तामिळनाडूत सरकार स्थापनेचा पेच अद्याप कायम असून अॅटर्नी जनरलने राज्यपालांना विधानसभेचे विशेष सत्र बोलवण्याचा सल्ला दिला आहे. आठवडाभरात यातून तोडगा निघावा यासाठी विधानसभेचे विशेष सत्र बोलवून दावेदार नेत्यांचे शक्ती परीक्षण घेण्याचा मार्ग अॅटर्नी जनरलने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना सुचवला आहे.
 
एआयएडीएमके मधील दुफळीवर हाच उपाय असल्याची भूमिका अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी मांडली. आपल्या सल्ल्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी १९९८ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या पेचाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उदाहरण दिले. उत्तर प्रदेशात जगदंबिका पाल आणि कल्याणसिंह यांच्यादरम्यान मुख्यमंत्रिपदासाठी वाद झाला.
 
त्यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेत बहुमत घेण्याचा निर्णय दिला होता. दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या विश्वासार्ह शशिकला यांचे राजकीय भवितव्य अद्यापही अधांतर असून बेहिशेबी मालमत्तेचा खटलाही अद्याप सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
 
११९ आमदारांकडून लिखित शपथपत्र
व्ही.के. शशिकला यांचे समर्थन करणाऱ्या ११९ आमदारांना अवैधरीत्या डांबून ठेवल्याचा आरोप होत आहे. मद्रास उच्च न्यायालयाने या समर्थकांना लिखित स्वरूपात शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले. स्वेच्छेने आपण रिसॉर्टमध्ये राहत आहोत असेे लेखी स्वरूपात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 
 
बातम्या आणखी आहेत...