आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वत:हून 20 वर्षे मोठ्या महिलेवर केले प्रेम, नंतर केली हत्‍या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर (झारखंड)- 2016मधील एका मर्डर केसला सोडवण्‍यामध्‍ये पोलिसांना यश आले आहे. मात्र तपासामध्‍ये जे सत्‍य समोर आले, ते ऐकून अनेकांना धक्‍का बसला आहे. प्रकरण असे आहे की, एका भाच्‍याचे स्‍वत:हून 20 वर्षे मोठ्या काकूवर प्रेम जडले होते. त्‍यानंतर दोघांमध्‍ये प्रेमसंबंध स्‍थापित झाले. मात्र काही काळानंतर काकूने संबंधासाठी नकार दिला. त्‍यामुळे संतापलेल्‍या भाच्‍याने त्‍यांची हत्‍या केली. 

असे आहे पूर्ण प्रकरण 
- टाटा स्‍टीलचे कर्मचारी कार्तिक कुमार यांची पत्‍नी खेमलता देवी यांची 28 जून, 2016 रोजी हत्‍या झाली होती.    
- खेमलता आणि कार्तिक कुमार यांना कोणतेही अपत्‍य होत नव्‍हते. त्‍यामुळे खेमलता यांनी आपल्‍यापेक्षा 20 वर्षे लहान विनय कुमार याच्‍याशी संबंध ठेवले. नंतर मात्र या नात्‍याला त्‍या संपवू इच्छित होत्‍या.
- हेमलता आणि विनय कुमार याच्‍यांमध्‍ये 2 वर्षे संबंध होते. तरीही हेमलता यांना पुत्रप्राप्‍ती झाली नाही. त्‍यामुळे यापुढे ते विनयशी संबंध ठेवू इच्छित नव्‍हते. 
- नाते संपवण्‍याबाबत त्‍यांनी विनय कुमारला सांगितले. त्‍यामुळे विनय अतिशय नाराज झाला आणि त्‍याने हेमलता यांच्‍या हत्‍येची योजना बनविली. 

हत्‍येनंतर अंत्‍यसंस्‍कारातही सहभागी झाला विनय 
- पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार, विनय 28 जून रोजी हेमलता यांच्‍या घरी गेला आणि दोघांनीही संबंध ठेवले. 
- त्‍यानंतर हेमलता यांनी‍ विनयला सांगितले की, त्‍या या पुढे संबंध ठेवू इच्छित नाही. हे ऐकून विनयला अतिशय राग आला आणि त्‍याने तेथेच त्‍यांची हत्‍या केली. 
- घटना घडली तेव्‍हा हेमलता यांचे पति कार्तिक राम घरी नव्‍हते. हत्‍येनंतर विनयने रक्‍ताचे डाग साफ केले आणि नंतर रडत रडत अंत्‍यसंस्‍कारातही सहभागी झाला. 
- नंतर पोलिसांनी तपासादरम्‍यान आरोपी विनयची चौकशी केली. पोलिसांना विनयवर शंका येताच त्‍यांनी त्‍याला पोलिसी खाक्‍या दाखविला. नंतर विनयने आपला गुन्‍हा कबूल केला व पोलिसांना सर्व माहिती दिली. तो आता तुरुंगात आहे. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटोज... 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...