आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aurangabad\'s Two Youth Make Railway Ticket Jagaad App

औरंगाबादच्या दोन तरुणांनी शोधले रेल्वे तिकीट जुगाड अॅप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता/औरंगाबाद - रेल्वेने प्रवास करायचाय, पण तिकीट कन्फर्म नाही. प्रत्येक ठिकाणी वेटिंगच दिसते आहे. अशा वेळी तिकिटाचे जुगाड कसे करायचे, असा प्रश्न बहुतेकवेळा बऱ्याच जणांना पडतो. औरंगाबादच्या शुभम बलदवा आणि रुणाल जाजू या तरुणांनी यावर तोडगा शोधला आहे. जमशेदपूर एनआयटीचा विद्यार्थी आणि सध्या सिंगापूर येथे नाेकरीस असलेल्या शुभमने कन्फर्म तिकिटासाठी पर्यायी मार्ग सुचवणारे "तिकीट जुगाड' अॅप शोधून काढले आहे. खरगपूर आयआयटीत दुसऱ्या वर्षाला असलेल्या रुणालने या कामी त्याला मदत केली. रुणाल हा शुभमच्या मामाचा मुलगा आहे.

सध्या हे अॅप अँड्राॅइडवरच आहे. महिनाभरात पाच हजारांहून अधिक वेळा ते डाऊनलोड झाले आहे. औरंगाबादेत राहणाऱ्या शुभमला जमशेदपूरला जाण्यासाठी नेहमीच भुसावळ किंवा नागपूरहून जावे लागायचे. एकदा त्याला वेटिंग तिकीट मिळाले, पण रेल्वेत चढल्यावर अनेक आसने रिकामी दिसली. तेव्हाच तंत्रज्ञानाच्या साह्याने यावर तोडगा काढण्याचे त्याने ठरवले.

१.५ लाखाचे पहिले पारितोषिक
तिकीट जुगाड अॅपच्या स्टार्टअपसाठी शुभम व रुणालच्या या प्रयोगाला खरगपूर आयआयटीच्या वार्षिक ग्लोबल बिझनेस माॅडेल काॅम्पिटिशनमध्ये १.५ लाखांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले. आता वेबसाइटसोबतच अॅपलच्या आयओएस आॅपरेटिंग सिस्टिमवर हे अॅप आणण्याच्या तयारीत आहे.

कसे चालते अॅप
प्रत्येक स्थानकाचा तिकिटांचा कोटा ठरलेला असतो. समजा तुम्हाला "ए' स्थानकावरून प्रवास सुरू करायचा आहे. परंतु कोटा पूर्ण झालेला आहे. अशा वेळी हे अॅप मार्गावरील "ए' स्थानकाच्या आधीच्या किंवा नंतरच्या स्थानकाचा शोध घेते. कोटा रिकामा पडलेला असेल ते स्थानक हाती येते. मग क्लीअरट्रीप तिकीट एजन्सीच्या मदतीने कन्फर्म तिकीट घेता येईल.

पुढे वाचा.. एजंटप्रमाणे काम करणार