बंगळुरू - एका ऑस्ट्रेलियाच्या जोडप्याने पायावर देवी-देवतांचे टॅटू काढले आहेत. काही लोकांनी हे टॅटू पाहिले नि विदेशी पर्यटकांसोबत वाद घातला. शनिवारी मॅट कीथ उर्फ मॅथ्यू गॉर्डन आणि त्याची गर्लफ्रेंड एमली हे दोघे पायावर टॅटू काढून फिरत होते.
मॅथ्यू आणि गर्लफ्रेंड एमली यांना शनिवारी रेसिडेंसी रोडवरील एका हॉटेलबाहेर एका जमावाने घेरले. या दोघांना जमावाने मारहाण केल्याचाही आरोप आहे. देवी- देवतांचा अवमान केल्यामुळे त्यांनी लिखीत माफी मागावी असा आग्रह जमावाने केला. या जोडप्याशी जमावाने वाद घातला तेव्हा व्हिडीओ शुट करण्यात आला. हा व्हिडीओ सोमवारी व्हायरल झाल्याने ही बाब उजेडात आली.
काय म्हणाला ऑस्ट्रेलियन नागरिक
या घटनेनंतर ऑस्ट्रेलियन नागरिक मॅथ्यू म्हणाला, "भारतीय संस्कृतीचा मी सन्मान करत आहे. त्यामुळेच मी टॅटू बनवला आहे.
- मॅट आणि एमली बंगळुरूमधील रेसिडेंसी रोडवर फिरत होते. मॅटने त्याच्या पायावर हिंदू देवी येल्लामाचे टॅटू बनवले होते. हा टॅटू पाहून लोकांनी त्यांच्याशी वाद घातला. मॅटच्या पाठीवर गणपतीचाही टॅटू होता.
- ही घटना घडली तेव्हा अशोकनगर पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी होते. मॅट आणि त्याच्या मैत्रीणीला पोलिस सोबत घेऊन गेले. जमावही तेव्हा त्यांच्या मागे मागे गेला. पोलिस आणि जमावाने या जोडप्यात जबरदस्ती लेखी माफीपत्र मागितले, असा आरोप आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाला मॅट.. 35 तास बसून पाठीवर काढले गणपतीचे टॅटू.., पाहा संबंधित फोटो आणि व्हिडीओ..